पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा जळगाव जिल्हा,त्यांचाच जळगाव ग्रामीण मतदारसंघात तापी पाटबंधारे विभागात खूप मोठा अपहार झालेला आहे.काम न करता बिल पेमेंट दिले गेले अशी माहिती नशिराबाद चे शेतकरी नितीन सुरेश रंधे यांनी शोधून काढली.गुलाबराव पाटील, लालचंद पाटील, एकनाथ खडसे यांना दिली.पैकी एकनाथ खडसे यांनी तापी पाटबंधारे जळगाव विभागाचे इ.डी. मन्ना डे यांची भेट घेऊन ताबडतोब कारवाई साठी आग्रह केला.ते आधी जलसंपदा मंत्री होते.म्हणून निधी पाण्यात कसा विरघळतो,हे त्यांना लवकर कळले.तसे तर गिरीश महाजन सुद्धा याच खात्याचे मंत्री होते.त्यांनाही कळले.पण ते चूप राहिले.कारण ,गिरीशभाऊ, सरकार आपले आहे.जरा सांभाळून घ्या.तिकडे अनिल पाटील यांनी याच विभागातील अमळनेर तालुक्यातील पाढळसे धरणाचे कारण दाखवून मंत्री पद मिळवले.त्यांना सुद्धा हा विषय कळला पाहिजे.कळला तर झाकून ठेवू नये.मंत्रीपद हे भ्रष्टाचार करण्यासाठी नसते.हे अनिल पाटील यांना माहिती असलेच पाहिजे.तर मग, त्यांनी तरी गुलाबराव आणि महाजन यांचेसारखे मुकबधीर बनू नये.पाप झाकायला काही मर्यादा असते की नाही?
जळगाव तापी पाटबंधारे विभागाचे इ.डी.मन्ना डे मला फोनवर म्हणाले की,ठाणेच्या अधिकारी कडे चौकशी सोपवली आहे.काय नोकर आहे? भ्रष्टाचार जळगाव ला आणि चौकशी ठाण्याला.का?तेथे वेड्यांचे इस्पितळ आहे म्हणून का?येथेच दप्तर पाहून आणि साईटवर जाऊन कळते की, भ्रष्टाचार झाला आहे.हे काम आणि हा खर्च.हे तर येथेच चेक करता येईल.
तिकडे मुख्यमंत्री शिंदे म्हणतात,की मी शेतकरी आहे.शेतकरीचा मुलगा मुख्यमंत्री झाला तर शेतकऱ्यांना न्याय देईन.त्यांचा हिताचा एक एक पैसा शेतकरी हितासाठी वापरू.पण शिंदे साहेब,येथे तर शेतकऱ्यांच्या नावाने दिलेला निधी परस्पर लुटला जातो आहे.चितळे अहवालानुसार एकटे अजितदादा पवार हे कल्प्रीट नाहीत.येथे तर चोरांची मोठी साखळी आहे.त्या साखळीची कडी जळगाव च्या तापी पाटबंधारे विभागात लोंबकळते आहे.मख्खनचोर झोळीत पहुडलेला आहे,आणि जळगाव जिल्ह्यातील तिसमारखे तीन मंत्री मिठाची गुळणी धरून आहेत.तीन मंत्री तीन विभिन्न पक्षाचे पण आहेत एकाच गुणांचे.यांनी शपथ कुठे घेतली असेल?" मी अमुक अमुक , ढमुक ढमुक यांचा सुपुत्र माझ्या आईबापाची शपथ घेतो की,मंत्री बनलो तर कायद्याला अनुसरून भ्रष्टाचार करीन.कोणी केला तर गोपनीयता ठेवीन."
एकनाथराव शिंदे, तुम्ही तर मुंबई मलबार हिल वरील नंदनवन बंगल्यात आमच्यासमोर जाहीर कबुली दिली होती की,"माझ्याकडे सर्वच मंत्री भ्रष्टाचारी आहेत.तर कोणाला घेऊ आणि कोणाला नको घेऊ? "
आणि आता तुम्ही आणि तुमचे मंत्री सिद्ध करीत आहेत कि , आम्ही सर्वच भ्रष्टाचारी आहोत.तुम्ही दिलेला शब्द खरा ठरवत आहेत
आम्ही जळगाव जागृत जनमंच चे शिवराम पाटील व राकेश वाघ , मुकुंद सपकाळे,अमोल कोल्हे यांनी भेट दिली.या उपोषणाचे व्हिडिओ चित्रण राकेश वाघ यांनी केले आहे.
... शिवराम पाटील
९२७०९६३१२२
महाराष्ट्र जागृत जनमंच
जळगाव


0 टिप्पण्या