• १२ हजार ८८० हेक्टर क्षेत्रात रोवणी तर ५०८ हेक्टर क्षेत्रात आवत्या
• ३२१.८० मिलिमीटर पावसाची पर्जन्यवृष्टी
कालिदास खोब्रागडे जिल्हा विशेष प्रतिनिधी भंडारा मो. 9545914324
भंडारा :- आद्रा नक्षत्रापासून पुष्य नक्षत्रापर्यंत पेरणी व रोवणीस पोषक पाऊस येत असल्यामुळे २४ जुलै पर्यंत २ हजार १४५.५५ हेक्टर क्षेत्रात नर्सरी(पऱ्हे) तर आवत्या धान ५०८.२० हेक्टर असे एकूण १३ हजार ३८८.२० हेक्टर क्षेत्रात धानाची लागवड करण्यात आली असून १२ हजार ८८० हेक्टर क्षेत्रात रोवणी पूर्ण झाली. त्याचे शेकडा प्रमाण ६० टक्के आहे. असे तालुका कृषी अधिकारी यांचे खरीप हंगाम पीक पेरणी अहवालात नमूद आहे. याशिवाय कडधान्य १ हजार ३२.३५ हेक्टर, गळीत धान्य ५.५० हेक्टर, भाजीपाला ११८.३० हेक्टर, मसाला पिके १.५० हेक्टर, ऊस १७.५० हेक्टर, पपई ०.५० हेक्टर, चारा पिके २ हेक्टर असे लागवडी खालील एकूण १४ हजार ५६५.८५ हेक्टर आहे.
तालुक्यात मोठा किंवा मध्यम सिंचन प्रकल्प अस्तित्वात नसल्यामुळे बहुतांश शेतजमीन कोरडवाहू होती. त्यामुळे धान उत्पादकांना नेहमीच दुष्काळ सदृश्य परिस्थितीचा सामना करावा लागत असे. यावर मात करण्यासाठी अनेक अल्प व अत्यल्प शेतकऱ्यांनी शासकीय योजनेतून सिंचन विहिरी तयार केल्या तर सधन शेतकऱ्यांनी शेतात खासगी बोअरवेलची व्यवस्था केल्याने सिंचन क्षेत्रात वाढ झाल्यामुळे रोहिणी व मृग नक्षत्र कोरडे गेले असले तरी बहुतांश सिंचनाची सोय असलेल्या शेतकऱ्यांची पेरणी आटोपण्याच्या मार्गावर होती. २६ व २७ जून रोजी झालेल्या अतिवृष्टीने कोरडवाहू शेतकऱ्यांनीही पेरणीस सुरुवात केली. पुनर्वसु व पुष्य नक्षत्रात पोषक पाऊस येत आहे.
साकोली व लाखांदूर तालुक्याचे विभाजन करून लाखनी तालुक्याची निर्मिती करण्यात आली. भौगोलिक क्षेत्र ३३ हजार १७३.३६ हेक्टर असून खरीप पिकाखालील क्षेत्र २२ हजार २०७.७८ हेक्टर आहे. खरीप हंगाम २०२३ मध्ये अन्यधान्य, कडधान्य, गळीतधान्य, भाजीपाला, मसाला पिके, ऊस, फळबाग व चारा पिकांची लागवड केली जाते. २४ जुलै पर्यंत पऱ्हे (नर्सरी) २ हजार १४५.५५ हेक्टर आणि आवत्या ५०८.२० हेक्टर क्षेत्रात अशी एकूण १३ हजार ३८८.२० हेक्टर क्षेत्रात पेरणी तर १२ हजार ८८० हेक्टर क्षेत्रात रोवणी झाली असल्याचे तालुका कृषी अधिकारी यांचे अहवालात नमूद आहे.
*सरासरीपेक्षा कमी पर्जन्यवृष्टी(चौकट)*
लाखनी तालुक्याचे १ जून ते २४ जुलै पर्यंत पर्जन्यमान ३९१.२० मिलिमीटर आहे. खरीप हंगाम २०२३ मध्ये याच कालावधीत ३२१.८० मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली. त्यात पोहरा ३२७.७० मिलिमीटर, लाखनी २३२.१० मिलिमीटर, पालांदूर ३०९.२० मिलिमीटर, पिंपळगाव २२६.४० मिलिमीटर आणि मुरमाडी/तूप. ५१३.६० मिलिमीटर अशी सरासरी ३२१.८० मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली. शेकडा प्रमाण ८२.३० टक्के आहे.


0 टिप्पण्या