• लाखनी उड्डाण पुलावरील प्रकार
• उड्डाण पूल दुरुस्तीचे काम जोमात
कालिदास खोब्रागडे जिल्हा विशेष प्रतिनिधी भंडारा मो. 9545914324
भंडारा :- केंद्रीय राजमार्ग बंदरे विकास मंत्री नितीन गडकरी यांनी उड्डाण पुलाचे डिजिटल लोकार्पण प्रसंगी "जगातील सर्वोत्तम तंत्रज्ञानाचा उपयोग करून तयार केलेला उड्डाण पुल उत्तम प्रतीचा आहे" अशी ग्वाही दिली होती. पण ती फोल ठरली. ४ महिन्यातच तांत्रिक कारणामुळे वाहतुकीस बंद करण्यात आला. दोष निवरणानंतर पुन्हा वाहतूक सुरू झाली. पण पावसाळ्यात उड्डाण पुलावर खड्डे पडल्याने वाहन चालकांना त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे या उड्डाण पुलाचे गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.
लाखनी शहराला मध्यभागातून दुभागनाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३(जुना ६) चे चौपद्रीकरण झाल्यामुळे सुसाट वेगाने वाहने चालविण्यात येत असत. त्यामुळे अनेक अपघात होऊन काहींना आपला जीव गमवावा लागला. तर काही कायमचे अपंग झाले. जनतेच्या मागणीवरून साकोली विधानसभा क्षेत्राचे तत्कालीन आमदार बाळा(राजेश) काशिवार यांचे प्रयत्नाने केंद्र राजमार्ग व बंदरे विकास मंत्री ना. नितीन गडकरी यांनी केसलवाडा/वाघ फाटा ते स्मशानभूमी लाखनी पर्यंत अंदाजे २.५०० किमी उड्डाण पुलास मंजुरी प्रदान केली.
निवीदा पद्धतीने उड्डाण पुल बांधकामाचे कंत्राट जेएमसी प्रायव्हेट लिमिटेड मुंबई ह्या कंपनीस देण्यात आले. जवळपास २ ते अडीच वर्षानंतर उड्डाण पुलाचे बांधकाम पूर्ण झाले. पण लोकार्पणास मुहूर्त मिळत नसल्यामुळे तत्कालीन पालकमंत्री विश्वजित कदम यांचे नेतृत्वात उड्डाण पूल वाहतुकीसाठी खुला करण्याची तंबी दिल्याने कंपनीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी थातूरमातूर पूजापाठ करून उड्डाण पुल वाहतुकीस खुला केला. ३ महिने होत नाही. तोच काही पिल्लर जवळून गॅप वाढल्यामुळे कर्णकर्कश आवाज येऊ लागल्याने सामाजिक कार्यकर्त्यांकडून ध्वनी प्रदूषणाची भीती व्यक्त केल्याने पुन्हा वाहतूकीसाठी उड्डाण पूल बंद करण्यात आला. दोष निवारणानंतर पुन्हा सुरू करण्यात आला.
लगेच पावसाळा सुरू झाला पावसाळ्यात उड्डाण पुलावरून अवजड वाहतूक सुरू होती. उड्डाण पूल बांधकामात साहित्याचा अल्प प्रमाणात वापर केल्याने ३ महिन्यातच उड्डाण पुलास ठिकठिकाणी खड्डे पडल्याने केंद्रीय राजमार्ग व बंदरे विकास मंत्री नामदार नितीन गडकरी यांनी काढलेले गौरवोद्गार फोल ठरल्याने वाहन चालकांना अकारण त्रास सहन करावा लागत असला तरी आपले बिंग फुटू नये म्हणून उड्डाण पुलाच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे. त्यामुळे उड्डाण पुलाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.


0 टिप्पण्या