Ticker

6/recent/ticker-posts

पुणे शहरातील सर्वात प्रथम वंचित बहुजन आघाडीच्या ध्वजाचे उद्घाटन वंचित बहुजन आघाडीचे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष युवा नेते सर्वजीत बनसोडे यांच्या हस्ते संपन्न


मिलिंद गायकवाड उपसंपादक महा, चित्रा न्यूज मो 9860179256


पुणे :- दिनांक 12 जुलै 2023 रोजी पुणे शहरातील प्रथम ध्वजस्तंभाचे व प्रभाग क्रमांक 21 शाखा फलकाचे उद्घाटन महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते वसंतदादा साळवे व महाराष्ट्र उपाध्यक्ष सर्वजित दादा बनसोड यांच्या हस्ते संपन्न झाला* यावेळी शाखेचे महत्त्व पटवून देऊन तसेच शाखाध्यक्षांशी स्वतः श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर संवाद साधणार असून जास्तीत जास्त वंचित बहुजन आघाडीच्या शाखा किती महत्त्वाच्या आहेत हे पटवून देऊन महाराष्ट्र उपाध्यक्ष सर्वजित बनसोडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले तसेच वसंतदादा साळवे यांनी व पुणे शहराच्या वतीने पुणे शहराचे महासचिव एडवोकेट अरविंद तायडे यांनी प्रभाग शाखेला शुभेच्छा दिल्या. सदर कार्यक्रमास पुणे शहर महासचिव सुनील धेंडे सर, पुणे शहर उपाध्यक्ष दीपक भाऊ शिकोत्रे, विनोद जाधव, विकास भेगडे पाटील ,पुणे शहर संघटक रफिक भाई शेख , राजाभाऊ ढाले , सहसंघटक बाबासाहेब वाघमारे , प्रसिद्धीप्रमुख संदीप चौधरी गौरव जाधव , पुणे शहर ट्रान्सपोर्ट कामगार युनियनचे सचिव रितेश भाऊ गायकवाड, हडपसरचे नेते जीवन तात्याभडके,युवा नेते मिलिंद दादा सरवदे, पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभेचे संघटक अमित भाऊ जगताप, प्रभाग २२ चे उपाध्यक्ष सचिन भडकवार,प्रभाग 20 शाखा अध्यक्ष विनोद जकाते, प्रभागाचे 21चे मार्गदर्शक दादासाहेब गायकवाड , प्रभाग 21 चे अध्यक्ष अजितभाऊ वाघमारे,महासचिव सूरज शेलार,उपाध्यक्ष संदेश कांबळे,सिद्धार्थ माळशिखरे,संघटक अनिल नवगिरे,प्रसिद्धीप्रमुख विकास कांबळे, राहुल इजगज, व प्रभागाचे कार्यकर्ते आयन मदारी, इब्राहिम मदारी, जुनेद मदारी, संविधान एकता समितीकडून आमचे मार्गदर्शक चळवळीचे नेते संतोषभाऊ सापळे यांनी सुद्धा प्रभाग शाखेला शुभेच्छा देऊन मार्गदर्शन केले व त्यांच्या सोबत विजयभाऊ जगताप आणि त्यांचे सहकारी , सुनील जावळे, उमेश भाऊ मोरे , सुहास माळी , प्रफुल्ल वाघमारे , रंजीत जगताप मुकुंद माने , गणेश चव्हाण अतुल बनसोडे , विठ्ठल साबळे प्रशांत शेलार,सलमान शेख आदी कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी प्रभाग अध्यक्ष अजित भाऊ वाघमारे यांनी प्रभागात कार्यकारणी सोबत अजून जोमाने काम करून वंचित बहुजन आघाडीच्या जास्तीत जास्त शाखा उघडण्याचा मानस असल्याचे मनोगत व्यक्त केले व कार्यक्रमास आलेल्यांचे आभार मानले यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वप्निल वाघमारे पुणे शहर सचिव यांच्यामार्फत करण्यात आले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या