कालिदास खोब्रागडे जिल्हा विशेष प्रतिनिधी भंडारा मो. 9545914324
भंडारा :-लाखनी तालुक्यातील केसवाडा/पवार ग्रामपंचायतीने ५ वर्षात १० हजार वृक्ष लागवडीचा संकल्प केला आहे. सुरुवात २ हजार वृक्ष लागवडीने झाली आहे. असाच सर्वच ग्रामपंचायतींनी विचार केल्यास पर्यावरण संतुलनासाठी वृक्ष लागवड ही सामाजिक चळवळ होणार. असे जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी केसलवाडा/पवार येथे लोक सहभागातून वृक्षारोपण कार्यक्रमात उपस्थितांना मार्गदर्शन करतांना आपले विचार व्यक्त केले. तसेच २ हजार वृक्षांचे संगोपन व देखभालीसाठी पंचायत समिती स्तरावर अंदाजपत्रक तयार करावे असे निर्देश दिले. गावकऱ्यांनी दर्शविलेला लोकसहभाग अभूतपूर्व असून यामुळे आदर्श गावाच्या वाटचालीची ही पहिली पायरी असल्याचेही जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी सांगितले.
सामाजिक कार्यकर्ता रामेश्वर बिसेन यांचे पुढाकाराने केसलवाडा/पवार ग्रामपंचायतीचे हद्दीतील पडीक सरकारी जागा, सार्वजनिक चौक, रस्त्याचे दुतर्फा व स्मशानभूमीतील मोकळ्या जागेत लोक सहभागातून २ हजार वृक्ष लागवडीकरिता वृक्षारोपण कार्यक्रमाचे मंगळवारी(ता.२५) रोजी आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी उपवनसंरक्षक राहुल गवई, मुख्य मार्गदर्शक जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर, विशेष अतिथी मुख्य कार्यकारी अधिकारी समिर कुर्तकोटी, जिल्हा युवक बिरादरी च्या अध्यक्ष सरिता फुंडे, इंजी. वसंता येळेकर, तहसीलदार दत्तात्रय निंबाळकर, गटविकास अधिकारी रोहिणी डोंगरे, पोलिस निरीक्षक मिलिंद तायडे, सेवा दलाचे जिल्हाध्यक्ष कैलास भगत प्रमुख अतिथी सभापती प्रणाली सार्वे, जि.प. सदस्य सूर्मिला अशोक पटले, प. स. सदस्य सुनील बांते, माजी जि. प. सदस्य ज्ञानेश्वर रहांगडाले, विस्तार अधिकारी प्रमोद हुमने, पोलिस पाटील अर्चना वंजारी, धान्य व्यापारी संजय बिसेन, तमुस अध्यक्ष दामोदर रहांगडाले, सोसायटी अध्यक्ष दिनेश येळेकर, पटसमिती चे नागो पुराम, वन समिती चे सोमा टेंभरे, पाणी वापर समितीचे नूतन ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
ग्रामपंचायतीच्या वतीने मान्यवरांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. मान्यवरांनी वृक्ष आणि त्याचे महत्त्व टिकवून ठेवल्यास कशा पद्धतीने गावात समृध्दी येते. या बाबद सखोल व अभ्यासपूर्ण मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सरपंच रोमिला बिसेन, सूत्रसंचालन ग्रामपंचायत सदस्य रामेश्वर बिसेन तर आभार सोसायटी अध्यक्ष दिनेश येळेकर यांनी मानले. कार्यक्रमाचा यशस्वितेसाठी ग्रामसेवक मोनाली लांडगे, उपसरपंच अनिल नंदेश्वर, ग्रामपंचायत सदस्य अमित खेडीकर, सदस्या छण्णू रहांगडाले, वंदना नंदेश्वर, अंजीर नांन्हे, कविता वलके, ग्रामपंचायत कर्मचारी लीलाधर रहांगडाले, वनिता कावळे, रोजगार सेवक राजू उईके यांनी अथक परिश्रम घेतले. कार्यक्रमास गावातील गणमान्य नागरिक, महिला व पुरुष बहुसंख्येने उपस्थित होते.


0 टिप्पण्या