• मजुरीचे दर वधारल्याने धान उत्पादक त्रस्त
कालिदास खोब्रागडे जिल्हा विशेष प्रतिनिधी भंडारा मो. 9545914324
भंडारा :- आद्रा नक्षत्राची सुरुवात पावसाने झाली त्यानंतर २६ व २७ जून रोजी अतिवृष्टीने पेरण्या खोळंबल्या होत्या. त्यानंतर पावसाने उसंत दिल्याने १९ जुलै पर्यंत २१ हजार ५४१.४५ हेक्टर क्षेत्रात धानाची लागवड करण्यात आली त्यात २१ हजार १६०.१५ हेक्टर क्षेत्रात पऱ्हे(नर्सरी) तथा ३८१.३० हेक्टर क्षेत्रात आवत्या धानाची लागवड करण्यात आली तर ३ हजार ६०४.६० हेक्टर क्षेत्रात रोवणीही झाली. एकूण धान लागवडीचे क्षेत्र ३ हजार ९८५.९० हेक्टर. याशिवाय कडधान्य ९३८.१५ हेक्टर, गळीत धान्य १.७० हेक्टर, भाजीपाला १०८.३० हेक्टर, मसाला पिके १.५० हेक्टर, ऊस ५.४० हेक्टर, चारा पिके २ हेक्टरअसे लागवडी खालील एकूण क्षेत्र ५ हजार ४३.४५ हेक्टर क्षेत्र असल्याचे तालुका कृषी अधिकारी यांचे पीक पेरणी अहवालात नमूद आहे.
तालुक्यात मोठा किंवा मध्यम सिंचन प्रकल्प अस्तित्वात नसल्यामुळे बहुतांश शेतजमीन कोरडवाहू होती. त्यामुळे धान उत्पादकांना नेहमीच दुष्काळ सदृश्य परिस्थितीचा सामना करावा लागत असे. यावर मात करण्यासाठी अनेक अल्प व अत्यल्प शेतकऱ्यांनी शासकीय योजनेतून सिंचन विहिरी तयार केल्या तर सधन शेतकऱ्यांनी शेतात खासगी बोअरवेलची व्यवस्था केल्याने सिंचन क्षेत्रात वाढ झाल्यामुळे रोहिणी व मृग नक्षत्र कोरडे गेले असले तरी बहुतांश सिंचनाची सोय असलेल्या शेतकऱ्यांची पेरणी अटोपण्याच्या मार्गावर होती. पण २६ व २७ जून रोजी झालेल्या अतिवृष्टीने कोरडवाहू शेतकऱ्यांनीही पेरणीस सुरुवात केली होती.
साकोली व लाखांदूर तालुक्याचे विभाजन करून लाखनी तालुक्याची निर्मिती करण्यात आली. भौगोलिक क्षेत्र ३३ हजार १७३.३६ हेक्टर असून खरीप पिकाखालील क्षेत्र २० हजार ६९८.५६ हेक्टर आहे. खरीप हंगाम २०२३ मध्ये अन्यधान्य , कडधान्य , गळीतधान्य, भाजीपाला , मसाला पिके , ऊस , फळबाग, व चारा पिकांची लागवड केली जाते. खरीप हंगाम २०२३ मध्ये १९ जुलै पर्यंत पऱ्हे (नर्सरी) २१ हजार १६०.१५ हेक्टर क्षेत्रात आणि आवत्या ३८१.३० हेक्टर क्षेत्रात अशी एकूण २१ हजार ५४१.४५ हेक्टर क्षेत्रात पेरणी तर ३ हजार ६०४.६० हेक्टर क्षेत्रात रोवणी झाली असल्याचे तालुका कृषी अधिकारी यांचे अहवालात नमूद आहे.


0 टिप्पण्या