🌞 दिन विशेष 🌞
इसवी सन २०२३ - २७ जुलै
शालिवाहन शक १९४५, विक्रम संवत २०७९
भा. रा. ५ श्रावण १९४५.
युगाब्द ५१२५
संवत्सर नाम : शोभन
अयन : दक्षिणायन
ऋतू : वर्षा
मास : अधिक श्रावण
पक्ष : शुक्ल
तिथी : नवमी (१५.४०) ~ दशमी
वार : गुरूवार
नक्षत्र : विशाखा (२५.२०) ~ अनुराधा
राशी : तुला (१९.२०) ~ वृश्चिक
*अब्दुल कलाम पुण्यस्मरण*
१७६१: माधवराव बल्लाळ भट उर्फ थोरले माधवराव, मराठा साम्राज्यातील चौथे पेशवे झाले.
१८६६ : आयर्लंडच्या व्हॅलेन्शिया द्वीपापासून कॅनडातील ट्रिनिटी बेपर्यंत समुद्राखालील तार घालण्याचे काम पूर्ण. यायोगे युरोप व अमेरिकेच्या , दरम्यान तारसंदेश पाठवणे शक्य झाले
१८८० : दुसरे अँग्लो-अफगाण युद्ध-मैवांदची लढाई - अफगाण सैन्याचा विजय. दोन्हीकडे असंख्य सैनिक मृत्यूमुखी.
१९२१: रक्तातील साखरेवर ’इन्सुलिन’ या संप्रेरकाचे नियंत्रण असते असे टोरांटो विद्यापीठातील सर फ्रेड्रिक बँटिंग आणि चार्ल्स बेस्ट यांनी सिद्ध केले. तसेच त्यांनी ’इन्सुलिन’ शुद्ध स्वरुपात विभक्त करण्यात यश आले..
१९४० : बग्स बनीचे चित्रपटसृष्टीत पदार्पण.
१९४९ : जगातील पहिले प्रवासी जेट विमान, डी हॅविललँड कॉमेटचे पहिले उड्डाण.
१९७६ : जपानचे पूर्व पंतप्रधान काकुएइ तनाकाला भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली अटक.
१९९० : त्रिनिदाद व टोबॕगोमध्ये जमात-ए-मुसलमीनने उठाव केला आणि संसद व दूरचित्रवाणी कार्यालयात मुक्काम ठोकला.
१९९९: द्रवखनिज तेलवायूचा (LPG) वाहनांसाठी इंधन म्हणून वापर करण्याचा प्रस्ताव पेट्रोलियम मंत्रालयाने मंजूर केला.,
२००२ : युक्रेनच्या ल्विव शहरात सुरू असलेल्या विमानांच्या प्रात्यक्षिकांदरम्यान सुखॉई एस.यु.२७ प्रकारचे विमान प्रेक्षकांवर कोसळले. ८५ ठार, १०० जखमी.
जन्मदिवस
१९११: डॉ. पां. वा. सुखात्मे, जगप्रसिध्द संख्या शास्त्रज्ञ
मृत्यूदिन
१९७५: मामासाहेब देवगिरीकर, खासदार, भारतीय राज्य घटनेचे मराठीत भाषांतर केले
१९९२: अमजद खान, अभिनेता
१९९७ : बळवंत लक्ष्मण वष्ट – हिंदुत्त्ववादी कार्यकर्ते
२००७ : वामन दत्तात्रय पटवर्धन – " स्फोटके व शस्त्रास्त्र तज्ञ
२०१५: APJ अब्दुल कलाम, पूर्व राष्ट्रपती
*।। दास-वाणी ।।*
मिश्रित त्रिगुण निवडेना ।
तेणे आद्यंत सृष्टिरचना ।
कोण थोर कोण साना ।
कैसा म्हणावा ।।
असो ही जाणत्याचीं कामें ।
नेणता उगाच गुंते भ्रमें ।
प्रत्यये जाणजाणों वर्मे ।
ठाईं पाडावी ।।
।। जय जय रघुवीर समर्थ ।।
दासबोध : १२/०८/१०-११
ब्रह्मा विष्णू महेश हे तीन देव जरी रज सत्व तमप्रधान असले तरी हे त्रिगुण एकमेकांत इतके मिश्रित असतात, की वेगळा असा एक गुण काढताच येत नाही.
ईश्वरापासून सर्व जीवसृष्टी ही त्रिगुणात्मक आहे. तीनही गुणांचे एकजीव मिश्रण आहे. सत्व रज तम यातील कोणता श्रेष्ठ, कोणता कनिष्ठ हे ठरविता येतच नाही. जीवासाठी हे तीनही गुण आवश्यकच आहेत.
पण हे जाणण्याचे काम ज्ञानी माणसानेच करावे. अज्ञानी माणसाने यात हात घालून स्वत:चा भ्रम आणि गुंता वाढवू नये.
सत्वगुणाच्या आधारे प्रत्यक्ष अनुभूती घेऊन रजोगुणाच्या सहाय्याने साधना करून अज्ञानरूपी तमोगुण दूर करावा. हाच परमार्थ होय.
काळरूपनिरूपण समास.
🙏 💐💐💐💐💐 🙏


0 टिप्पण्या