मौजा मांडेसर येथील जि.प. उच्च प्राथमिक शाळेचा उपक्रम
भवन लिल्हारे उपसंपादक ( चित्रा न्युज महाराष्ट्र राज्य ) मो.नं.9373472847
भंडारा : भंडारा जिल्हा मोहाडी तालुक्यातील मौजा मांडेसर येथे मा. किशोर लांजेवार उच्च श्रेणी मुख्याध्यापक यांच्या मार्गदर्शनात दिनांक २५ जुलै २०२३ रोजी शालेय मंत्रिमंडळ निवडणूक कार्यक्रम मोबाईल EVM ॲप द्वारे घेण्यात आले.
या शालेय मंत्रिमंडळ निवडणूक कार्यक्रमाचे मुख्य हेतू असे की, आगामी काळात विधानसभा निवडणुका जवळ आलेल्या आहेत. निवडणूक म्हणजे काय ? मोठी माणसे मतदान कसे करतात ? ईव्हीएम मशीन कशी असते ? मतमोजणी कशी करतात ? शाई का लावतात ? आणि येथील प्रक्रिया कशी असते ? असे अनेक प्रश्न विद्यार्थी शाळेतील शिक्षकांना सतत विचारत असतात. त्यावेळी शाळेतील तंत्रस्नेही शिक्षक मा. नरेंद्र उरकुडे सर यांनी शासनाच्या निर्देशाप्रमाणे शालेय विद्यार्थ्यांना दोन गटात विभाजन करून निवडणूक प्रक्रिया प्रत्यक्षात राबवण्याच्या निर्णय सहकारी शिक्षकांना बोलून मोबाइल EVM प्रक्रिया राबविण्यात आली.
यात सर्वप्रथम निवडणूक जाहीर प्रसिद्धी काढण्यात आली. १ ) निवडणूकीसाठी फार्म भरणे २ ) अर्ज मागे घेणे ३ ) उमेदवारास चिन्ह वाटप करणे ४ ) प्रचार करणे ५ ) प्रत्यक्ष निवडणूक दिनांक २५ जुलै २०२३ रोजी दुपारी ३ .३० ते ५ .०० वाजे पर्यंत होईल. अशी सूचना वर्ग एक ते आठवी पर्यंतचे संपूर्ण विद्यार्थ्यांना देण्यात आले.
पहिली ते आठवी पर्यंतच्या प्रत्येक वर्गासाठी विविध पदे सांगून वर्ग स्तर ची निवडणूक मोबाईल EVM वरून घेण्यात आली. यात शाळा नायक , शाळा उपनायक , शाळा सुरक्षा मंत्री, सांस्कृतिक व उपक्रम प्रमुख , सहल व शिस्त प्रमुख, परिपाठ व बाल सभा प्रमुख, गीत मंच प्रमुख , क्रीडा व आरोग्य प्रमुख , स्वच्छता व पाणी पुरवठा प्रमुख, वाचनालय व अभ्यास प्रमुख , शालेय पोषण आहार प्रमुख, शिक्षण , परिपाठ , आरोग्य , पाणीपुरवठा , स्वच्छता , भोजन , माहिती तंत्रज्ञान , क्रीडामंत्री अशी पदे निवडली गेली.
सोबतच त्यांची कामे सांगून जबाबदारी देण्यात आली. या पदासाठी निवडणूक घ्यायची तयारी करण्यात आली होती. यात एकूण २२ उमेदवार रंग मैदानात उभे होते. त्यापैकी ११ विद्यार्थी उमेदवाराची मोबाईल EVM ॲप द्वारे निवड करण्यात आली. त्यांना प्रचारासाठी वेळ देण्यात आली. वोटिंग मशीन अँप द्वारे ईव्हीएम तयार करत त्यात फोटोंसह उमेदवारी यादी तयार करून घेतली. आज डिजिटल वर्गात प्रत्यक्ष कसे मतदान करतात. हे माॅकपोल दाखवले. ब्यॉलेट बटन दाबल्यानंतर पसंतीच्या उमेदवाराच्या पुढील बटन दाबल्यावर हिरवा लाईट लागतो आणि विशिष्ट आवाज होतो. असे वर्ग १ ते ८ वी पर्यंतच्या संपूर्ण विद्यार्थांना समजावून सांगितले. नंतर प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रिया सुरू केली. शाळेतील १६४ विद्यार्थ्यांनी मतदानात भाग घेतला. मतदान केंद्राबाहेर मोठी रांग लावून दरवाजा जवळ एका विद्यार्थ्याला पोलीस बनवले. आणि रांगेवर नियंत्रण ठेवण्यास सांगितले. मुख्याध्यापक मा. किशोर लांजेवार यांच्या मार्गदर्शनाखाली मा. देवीदास के. माटे , व मा. सैलेंन्द्र गजभिये सर, यांनी मार्कर पेनने बोटावर शाही लावली. नरेंद्र उरकुडे सर, विठ्ठल माटे सर , राजू बी. बालपाडे सर यांनी ब्यॉलेट युनिट सांभाळले . विद्यार्थ्यांमध्ये खूप उत्साह दिसले.विद्यार्थ्यांच्या मोठा जण आक्रोश उमठल्याने पहावयास दिसले. विद्यार्थ्यांना मतदानाचा हक्क काय आहे. यातून समजविण्यात आले.
मतदान संपल्यानंतर निकाल लगेच जाहीर करण्यात आले. यात निवडून आलेले विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. निवडूण आलेले विद्यार्थी उमेदवारास मंत्रिमंडळात जबाबदारीची व मंत्रीपदाची शपथ देण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून श्री वनवास धनिस्कार सर व EVM व VVPAT ची तयारीत श्री. नरेंद्र निंबार्ते सर यांनी जबाबदारी सांभाळली. सर्व शिक्षकांनी निवडणूक कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अमूल्य वेळ दिली. या मंत्रीमंडळात निवडूण आलेले विद्यार्थी नामे - सुजल सव्वालाखे ( शाळा नायक ) सांजवी दमाहे ( शाळा उपनायक ) पलक सव्वालाखे (शाळा सुरक्षा मंत्री ) राशी सव्वालाखे (सांस्कृतिक व उपक्रम प्रमुख ) वृषभ सव्वालाखे ( शहल व शिस्त प्रमुख )नंदिनी सव्वालाखे ( परिपाठ व बालसभा प्रमुख ) रूही सव्वालाखे ( गित मंच प्रमुख ) रक्षा चोपकर ( क्रिडा व आरोग्य प्रमुख ) रश्मी सव्वालाखे (स्वच्छता व पाणीपुरवठा प्रमुख ) आराध्या लिल्हारे (वाचनालय व अभ्यास प्रमुख ) एकांत पशिने ( शालेय पोषण आहार प्रमुख ) या शालेय मंत्रिमंडळात निवडून आलेले संपूर्ण विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी प्रामुख्याने उपस्थित शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मा. भवनभाऊ लिल्हारे ' शाळा व्यवस्थापन समिती ' व शिक्षक, अंगणवाडी सेविका, प्रामुख्याने उपस्थित होते.


0 टिप्पण्या