कालिदास खोब्रागडे जिल्हा विशेष प्रतिनिधी भंडारा मो. 9545914324
भंडारा :- महात्मा गांधी तंटामुक्त गाव समिती केसलवाडा/पवार ची ग्रामपंचायत कार्यालयात नुकतीच सभा पार पडली. त्यात पैशाचा वाद, कुंपण, रस्ता आणि इतर किरकोळ स्वरूपाचे ७ भांडणतंटे आपसी सहमतीने सोडविण्यात आले. यात ग्रामपंचायत सदस्य रामेश्वर बिसेन यांनी महत्वाची भूमिका बजावली.
लहान-सहान, किरकोळ वादाचे मोठ्या भांडणात रूपांतर होऊन गावात शांतता व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो. हे किरकोळ स्वरूपाचे भांडणतंटे गावातच आपसी सहमतीने सोडविले जावे. या करिता माजी गृहमंत्री स्व. आर.आर. पाटील यांनी ग्रामीण परिसरात महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीमेस सुरुवात केली. या प्रकाराने गावकऱ्यांचा वेळ आणि पैसा वाचण्यास मदत झाली.
केसलवाडा/पवार तमुस अध्यक्ष दामोदर रहांगडाले, निमंत्रक तथा पोलिस पाटील अर्चना वंजारी, सरपंच रोमिला रामेश्वर बिसेन, उपसरपंच अनिल नंदेश्वर, ग्रामपंचायत सदस्य रामेश्वर बिसेन, ग्रामसेवक मोनाली मेश्राम, तंटामुक्त समिती सदस्य दुर्योधन बिसेन, सोमा टेंभरे, सतीश बिसेन, भिवा नान्हे यांचे प्रमुख उपस्थितीत घेण्यात आली. त्यात शत्रूघन येळेकर, शारदा कावळे, अर्पण नान्हे, राजेश कटरे, माणिक राऊत यांचे पैशाचे देवाणघेवाणीचा वाद, रस्ता व कुंपणाचा वाद आपसी सहमतीने निकाली काढण्यात आला. प्रास्ताविक ग्रामपंचायत सदस्य रामेश्वर बिसेन यांनी तर आभार पोलिस पाटील अर्चना वंजारी यांनी मानले. सभेला अर्जदार, गैरअर्जदार व समिती सदस्य प्रामुख्याने उपस्थित होते.


0 टिप्पण्या