Ticker

6/recent/ticker-posts

आमदारांना कामाचे श्रेय पाहिजे, गुणवत्ता का नको ?

         जळगावकडून पाचोराकडे जाणारा ईच्छा देवी ते डी मार्ट रस्ता आमदारांनी निधी आणला.म्हणून बनला.रस्ता सात महिन्याचा गर्भातच असतांना आमदार भोळे व मंत्री महाजन यांच्या नावाचे बैनर डी मार्ट जवळ झळकले.जसे काही इंग्लंड कडून अंदमान निकोबार जिंकून घेतले.निधी आणणे हे आमदाराचे, मंत्री चे कर्तव्य असते.ते उपकार करीत नाहीत.रस्ते चांगले बनवले, गटार चांगली बांधली तर बैनर लावून प्रसिद्धी घेण्याची गरज पडणार नाही.कंडीशन एकच मक्तेदार कडून काहीच मागू नका,घेऊ नका.नाही घेतले तर दरिद्री येणार नाही.
     आता डी मार्ट जवळ रस्ता अजूनही अर्धवट सोडलेला आहे.पण बाजूला कोनशिला लावून मोकळे झाले.इतकी घाई कशाला?हा उतावीळ पणा कशाला?कामे चांगली करा.श्रेय आपोआप मिळेल.बैनर लावून श्रेय घेत असाल आणि खाली ठेंच लागली तर शिवी हासडणारच.
     आता डी मार्ट कडून अब्दुल हमीद चौक कडे गटार बांधकाम चालू आहे.तेथील नागरिकांनी व्हिडिओ घेऊन पाठवली.तर दोन सळईमधील अंतर १२ ऐवजी २०इंच,२२इंच, ३७इंच दिसत आहे.तसेच खाली विटांची गटार बांधून वर ढापा टाकणे सुरु आहे.किमान विटांवर प्लॅस्टर तरी केले पाहिजे.नाहीतर गटार टिकणार नाही.शिवाय गटारीची तळ किमान भींतीसारखा स्मूथ बनवला पाहिजे.तरच पाणी प्रवाही होईल.पण मक्तेदाराने तळ खडबडीत ठेवून ढापा टाकणे चालू आहे.तळ स्मूथ नसेल तर दगड, लाकूड,कपडा, प्लॅस्टिक अडकून पाणी ब्लॉक होईल.पुन्हा तक्रार.पुन्हा कटकट.ही जबाबदारी सार्वजनिक बांधकाम अभियंत्यांची आहे.पण ते सरकारचे जावई आणि मंत्र्यांचे एजंट सारखे ताठर भुमिकेत दिसतात.आमचे कोण काय वाकडे करू शकतो? पण पुढील विधानसभा निवडणुकीत आमदार भोळेंचे वाकडे होऊ शकते.आमदार भोळेंनी हे काम चोख करून घेतले पाहिजे.पण आमदार भोळे हेच लोकांना आरटीआय टाकायचा उपदेश करीत असतील तर टाईमपास करण्याचा इरादा दिसतो.येथे काम चोख झाले पाहिजे.कामाचे टेक्निकल इन्फॉर्मेशन बोर्ड लावले पाहिजे.का नाही लावत?वर्क ऑर्डर मागेल त्याला दिली पाहिजे.का नाही देत? काहीतरी लपवालपवी वाटते.
    आमदार भोळेंचे कामकाज पारदर्शक नाही.पारदर्शक म्हणजे आम जनतेला कळेल असे.नियमाला धरुन काम करणे.

... शिवराम पाटील
९२७०९६३१२२
महाराष्ट्र जागृत जनमंच
जळगाव

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या