Ticker

6/recent/ticker-posts

💐 || सुमंगल सुप्रभात || 💐‌ 🌞 दिन विशेष 🌞

💐  || सुमंगल सुप्रभात ||  💐
‌          🌞 दिन विशेष  🌞
‌इसवी सन २०२३ - ३१ ऑगष्ट
‌शालिवाहन शक १९४५, विक्रम संवत  २०७९
‌भा. रा. ९ भाद्रपद १९४५.
युगाब्द ५१२५
संवत्सर नाम : शोभन
अयन : दक्षिणायन
ऋतू :   वर्षा
मास :  निज श्रावण  
पक्ष :   शुक्ल          
तिथी : पौर्णिमा (०७.००) ~ प्रतिपदा    
वार : गुरूवार 
नक्षत्र : शततारका (१७.४०) ~ पूर्वभाद्रपदा                                     
राशी :   कुंभ 

*निज श्रावण पौर्णिमा* 
(पौर्णिमा समाप्ती सकाळी ७ वाजता)
व्रती पौर्णिमा 
कोकिळा व्रत समाप्ती 
बृहस्पती पूजन 
महर्षि भृगु अवतरण दिन
सिद्धारूढ स्वामी पुण्यतिथी (कर्नाटक)

सूर्याचा पूर्वा नक्षत्रात प्रवेश (सकाळी ९.३० ला, वाहन मोर)

१८९७: थॉमस अल्वा एडिसनने कायनेटोस्कोपचे पेटंट घेतले.
१९२०:खिलाफत चळवळीची सुरूवात
१९२०: डेट्रोइट मध्ये ८ एमके द्वारे पहिला रेडिओ कार्यक्रम प्रसारित झाला.
१९४७:भारताची प्रमाणवेळ निश्चित करण्यात आली.
१९७०:राष्ट्रपती व्ही. व्ही. गिरी यांच्या हस्ते कन्याकुमारी येथील विवेकानंद स्मारकाचे उद्घाटन झाले.
१९७१:अमेरिकन अंतराळवीर डेव्हिड स्कॉट हा चंद्रावर मोटारगाडी चालवणारा पहिला मानव बनला. चंद्रावर पाऊल ठेवणारा तो सातवा मानव आहे.
१९९६: पांडुरंगशास्त्री आठवले यांना मॅगसेसे पुरस्कार प्रदान.
१९९७: प्रिन्सेस डायना आणि तिचा मित्र डोडी अल फायेद अपघातात  ठार झाले.
२००५: बगदादच्या अल-आइम्माह पूलावर झालेल्या चेंगराचेंगरीत १,१९९ ठार.

जन्मदिवस :
१९६३: भारतीय अभिनेते, दिग्दर्शक आणि पटकथालेखक ऋतुपर्ण घोष. 
१९४०:शिवाजी सावंत – साहित्यिक. त्यांची ’मृत्यूंजय’ ही कादंबरी इंग्रजी, कन्नड, गुजराती, मल्याळी इ. भाषांमध्ये प्रसिद्ध झाली. या कादंबरीला महाराष्ट्र, गुजरात व पश्चिम बंगाल या राज्यशासनांचे पुरस्कार मिळाले. तसेच भारतीय विद्यापीठ या संस्थेचा ’मूर्तीदेवी पुरस्कार’ पण मिळाला. 
१९३१:जयवंत कुलकर्णी – पार्श्वगायक 
१९१९:अमृता प्रीतम – पंजाबी भाषेतील प्रतिथयश लेखिका आणि कवयित्री. त्यांच्या ’कागज ते कॅनव्हास’ या कवितासंग्रहासाठी त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार (१९८१) देण्यात आला. ’रसीदी टिकट’ हे त्यांचे आत्मचरित्र प्रसिद्ध आहे.
१९०७:रॅमन मॅगसेसे – फिलिपाइन्सचे ७ वे राष्ट्राध्यक्ष. 
१९०२:दामू धोत्रे – रिंगमास्टर, कसरतपटू व सर्कस मालक. ‘वाघ, सिंह माझे सखे सोबती’ हे त्यांचे आत्मचरित्र प्रसिद्ध आहे.
१८९३: नारायण धोंडोपंत तथा ना. धों. ताम्हनकर – लेखक
१८७०:मारिया माँटेसरी – इटालियन डॉक्टर व शिक्षणतज्ञ. पूर्वप्राथमिक शिक्षणाविषयीच्या त्यांच्या उपक्रमामुळे तशा शाळा ’माँटेसरी’ या नावाने ओळखल्या जातात. 

मृत्यूदिन :
२०१२: भाजपाचे लोकसभा सदस्य (सुरत) व केंद्रीय मंत्री काशीराम राणा.
१९९५:‘खलिस्तानी‘ विभाजनवादी चळवळीचा कणा मोडून काढणारे पंजाबचे मुख्यमंत्री सरदार बियंत सिंग यांची चंडीगढ येथील सचिवालयाबाहेर शक्तिशाली बॉंम्बस्फोटाद्वारे हत्या 
१९७३:ताराबाई मोडक – शिक्षणतज्ञ. कोसबाड येथील आदिवासींच्या जीवनात बालशिक्षण व सुधारणांचे नंदनवन त्यांनी फुलवले. गुजरातेतील बार्टन फिमेल ट्रेनिंग कॉलेजच्या त्या पहिल्या भारतीय प्राचार्या होत्या. बालमंदिरांची निर्मिती हे ताराबाईंचे प्रमुख कार्य आहे.

*।। दास-वाणी ।।* 

डुरें विहीरे पाझर । 
पर्वत फुटोन वाहे नीर । 
ऐसे उदकाचे प्रकार । 
भूमंडळीं  ।। 

जितुके गिरी तितुक्या धारा । 
कोंसळती भयंकरा । 
पाभळ वाहाळा अपारा । 
उकळया सांडिती  ।। 

।। जय जय रघुवीर समर्थ ।। 
 दासबोध : १६/०४/०७-०८ 

आप आळोन पृथ्वी झाली हे खरे असले तरी जलतत्व पृथ्वीवर जागोजागी उदंड प्रमाणात आढळतेच. बावडी, विहीर, कूपामधे दीर्घकाल साठलेले पाणी असते. काही विहिरींना तळाशी जिवंत झरे असल्याने त्या कायम तुडुंब भरलेल्या असतात. डोंगर कपारीैतूनही स्वच्छ पाण्याचे पाझर फुटलेलेे पहायला मिळतात.

प्रत्येक पर्वतावरून लहान मोठया असंख्य धारा पावसाळयात दिसतात. प्रचंड कोसळणारे धबधबे आपले रौद्ररूप प्रगट करतात. ओहोळ झरे हे वाहात्या पाण्याचे सौम्य रूप. काही ठिकाणी तर जमिनीतून खळाळून वर येणारे उकळत्या पाण्याचे नैसर्गिक झरेही आढळतात. अशा जीवसृष्टीचे जीवन असलेल्या, विविधरूपात दर्शन देणाऱ्या आपोनारायणाला माझे भावपूर्ण वंदन.

आपनिरूपण समास.

 🙏 💐💐💐💐 💐 🙏

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या