रुपाली मेश्राम कार्य.संपादक चित्रा न्युज मो.9552073515
लातूर :- औसा शहरातील तक्षशिला बौद्ध विहार परिसरात अंतर्गत रस्ते, संरक्षण भिंत, नाली बांधकाम व सुशोभीकरण काम करण्यासह मतदारसंघातील ६५ समाजमंदिर बांधकाम करणे/ सुशोभीकरण करणे व दलित वस्तीत अंतर्गत रस्ते बांधकाम करणे इ कामांसाठी सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाकडून ५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. पूजनीय भंते सुमेधजी नागसेन भंतेजी यांच्या मार्गदर्शनाखाली औसा मतदारसंघातील सर्व समाजमंदिरांची दुरुस्ती, सुशोभीकरण करून, परिसरात वृक्षलागवड करून तसेच तिथे लाईट व बैठक व्यवस्था करून समाजमंदिरे प्रार्थनास्थळे म्हणून विकसित करण्याचे माझे व्हिजन आहे. ८० गावातील समाजमंदिरे प्रार्थनास्थळे म्हणून विकसित करण्यासाठी यापूर्वी मी ४ कोटींचा निधी मंजूर करून घेतला होता, आता पुन्हा उर्वरित गावांसाठी निधी मंजूर करून घेतला आहे.
राज्याचे मुख्यमंत्री मा श्री एकनाथरावजी शिंदे, उपमुख्यमंत्री मा श्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री मा श्री अजितदादा पवार व पालकमंत्री मा श्री गिरीशजी महाजन यांचे मनःपूर्वक आभार. काही दिवसांपूर्वीच औसा शहरातील तक्षशिला बौद्ध विहार परिसरात ध्यानधारणा केंद्र व संरक्षण भिंत बांधकाम करण्यासाठी १ कोटींचा निधी मंजूर करून घेतला होता तर आता तक्षशिला बौद्ध विहार परिसरात अंतर्गत रस्ते, संरक्षण भिंत व नाली बांधकाम आणि सुशोभीकरण काम करण्यासाठी ५० लक्ष रुपयांचा निधी मंजूर करून घेतला आहे. यापुढेही औसा मतदारसंघाच्या विकासासाठी निधीचा ओघ असाच सुरु राहील.


0 टिप्पण्या