💐 || सुमंगल सुप्रभात || 💐
🌞 दिन विशेष 🌞
इसवी सन २०२३ - २१ ऑगष्ट
शालिवाहन शक १९४५, विक्रम संवत २०७९
भा. रा. ३० श्रावण १९४५.
युगाब्द ५१२५
संवत्सर नाम : शोभन
अयन : दक्षिणायन
ऋतू : वर्षा
मास : निज श्रावण
पक्ष : शुक्ल
तिथी : पंचमी
वार : सोमवार
नक्षत्र : चित्रा
राशी : कन्या (१७.३०) ~ तुला
*नाग पंचमी*
*शिव पूजन*(शिवामूठ: तांदूळ)
*श्रावणी सोमवार*
*ऋक शुक्ल यजु: श्रावणी*
*दहशतवादाच्या बळींचे स्मरण व श्रद्धांजली दिन*
*जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन*
१८८८: विल्यम बरोज यांनी बेरजा करणाऱ्या यंत्राचे पेटंट घेतले.
१९११ : पॅरिसच्या लुव्र या संग्रहालयातुन लिओनार्डो-द-व्हिन्सी याचे मोनालिसा हे जगप्रसिद्ध चित्र चोरीला गेले.
१९३८: इटलीतील शाळांत ज्यू शिक्षकांवर बंदी घातली.
१९७२: वन्यजीव संरक्षण कायद्यास मान्यता मिळाली.
१९८८: भारत आणि नेपाळ यांच्या सीमेवर आलेल्या तीव्र स्वरूपाच्या भूकंपामुळे हजारो लोक मृत्युमुखी पडले.
१९९१: लाटव्हिया सोविएत युनियनपासुन स्वतंत्र झाला.
१९९३: मंगळाच्या शोधमोहिमेतील मार्स ऑब्झर्व्हर या यानाचा (NASA) पृथ्वीशी संपर्क तुटला.
जन्मदिवस
१८७१: भारत सेवक समाजाचे (Servants of India Society) एक संस्थापक सदस्य गोपाळ कृष्ण देवधर. ’सेवासदन’ या संस्थेचे शिल्पकार, सहकारी चळवळीचे आद्य समर्थक.
१९०९: नागोराव घनःशाम तथा ना.घ. देशपांडे, कवी.
१९१०: नारायण श्रीधर बेन्द्रे – आदिम कलेपासून चिनी चित्रकलेपर्यंत अनेक शैलीविशेष आत्मसात केलेले जगप्रसिद्ध चित्रकार
१९१५: राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध भारतीय उर्दू भाषिक कादंबरीकार, लघुकथा लेखिका, आणि चित्रपट निर्मात्या इस्मत चुग़ताई.
१९२४: श्रीपाद अच्युत दाभोळकर – ‘प्रयोग परिवार‘ या संकल्पनेचे प्रवर्तक, गणितज्ञ आणि जमनालाल बजाज पुरस्काराने गौरवण्यात आलेले कृषीशास्त्रज्ञ.
१९३४: सुधाकरराव नाईक, महाराष्ट्राचे १३वे मुख्यमंत्री
१९७३: गूगल चे सहसंस्थापक सर्गेइ ब्रिन.
१९८१: कनेक्ट्यू चे सहसंस्थापक कॅमेरॉन विंकल्वॉस.
१९८६: उसेन बोल्ट, जमैकन धावपटू.
मृत्यूदिन
१९३१: ’गायनाचार्य’ पं. विष्णू दिगंबर पलुस्कर, गायक, संगीतकार, संगीत प्रसारक आणि गांधर्व महाविद्यालयाचे संस्थापक
१९४०: रशियन क्रांतिकारक लिऑन ट्रॉट्स्की,
१९४७: बुगाटी कंपनी चे संस्थापक इटोर बुगाटी.
१९७६: पांडुरंग सातू नाईक – आल्हाददायकता, कल्पकता व वास्तवता ही वैशिष्ट्ये असलेले चित्रपट छायालेखक (cinematographer).
१९७७: एस. एन. डी. टी. विद्यापीठाच्या कुलगुरू प्रेमलीला ठाकरसी,त्या शिक्षणतज्ञ आणि समाजसेवी सर विठ्ठलदास ठाकरसी यांच्या पत्नी होत्या. १९२५ मध्ये जेव्हा त्यांच्या पतीचा मृत्यू झाला तेव्हा त्या केवळ ३१ वर्षांच्या होत्या. तरीही त्यांनी शिक्षण आणि परोपकार या दोन्ही क्षेत्रात आपले कार्य चालू ठेवले आणि स्त्री शिक्षणासाठी स्वतःला समर्पित केले.
१९७८: विनू मांकड – सलामीचे फलंदाज व डावखुरे मंदगती गोलंदाज. पहिल्या क्रमांकापासून ते अकराव्या क्रमांकापर्यंत सर्व क्रमांकांवर फलंदाजी करण्याचा विक्रम. अशी कामगिरी करणारे फक्त तीनच खेळाडू आहेत. सर्वात कमी कसोटी (२३) सामन्यांमध्ये १००० धावा व १०० बळी घेण्याचा विक्रम. हा विक्रम बरीच वर्षे अबाधित होता. पुढे इंग्लंडच्या इयान बोथम यांनी २१ कसोटी सामन्यात ही कामगिर, विक्रम मोडला. एका कसोटी सामन्यात १० बळी घेणारे पहिले भारतीय गोलंदाज. १९५६ मध्ये पंकज रॉय बरोबार न्यूझीलंड विरुद्ध खेळताना त्यांनी पहिल्या विकेटसाठी ४१३ धावांची भागीदारी केली. हा विक्रम ५२ वर्षे अबाधित होता. नॉन स्ट्रायकर एन्डला असणारा ऑस्ट्रेलियाचा बिल ब्राऊन हा सारखा क्रीजच्या बाहेर जात असल्यामुळे मांकड यांनी त्याला धावबाद केले. बाद करण्यापूर्वी मांकड यांनी त्याला दोनदा ताकीद दिली होती. या नियमाला पुढे Mankading असे नाव पडले. १९४७ चे विस्डेन क्रिकेटर ऑफ द ईयर.
१९८१: आचार्य दत्तात्रय बाळकृष्ण तथा ’काकासाहेब’ कालेलकर – गांधीवादी देशभक्त, शिक्षणतज्ञ, समाजसुधारक, इतिहासकार, बहुभाषा कोविद, रसिक, सखोल चिंतक, गुजरात विद्यापीठाचे कुलगुरू (१९२८), राज्यसभा सदस्य (१९५२ – १९५८), अनुसूचित जमातींच्या आयोगाचे अध्यक्ष (१९५३), गुजराती साहित्यपरिषदेच्या अहमदाबाद अधिवेशनाचे अध्यक्ष (१९५९), हिन्दी विश्वकोश निर्मिती समितीचे सदस्य, साहित्य अकादमी पारितोषिक (१९६६) व फेलोशिप (१९७१) विजेते, पत्रकार व गुजराती साहित्यिक
१९९५: सुब्रमण्यन चंंद्रशेखर, नोबेल विजेते वैज्ञानिक सुब्रमण्यन चंद्रशेखर – तार्यांचे आयुर्मान व त्यांचा शेवट यावरील संशोधनासाठी १९८३ मध्ये नोबेल पारितोषिक मिळालेले भारतीय - अमेरिकन खगोल वैज्ञानिक. त्यांनी आपल्या आयुष्यातील बराच काळ कृष्णविवरांवरील संशोधनासाठी खर्च केला. यांचे काका सी. व्ही. रामन यांनाही भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक (१९३०) मिळाले आहे. भौतिकशास्त्रात नोबेल मिळवणारे हे दोघेच भारतीय वंशाचे आहेत.
२००१ : शरद तळवलकर – आपल्या सदासतेज अभिनयाने मराठी रसिकांच्या मनावर प्रदीर्घकाळ प्रसन्नतेचे अधिराज्य गाजवणारे विनोदी कलाकार.
२००६: बिस्मिल्लाखान, भारत रत्न सनई वादक
*।। दास-वाणी ।।*
नाना जळासी गंधी सुटे ।
तेथे पृथ्वीचे रूप प्रगटे ।
दिवसेंदिवस जळ आटे ।
पुढे पृथ्वी ।।
पत्रें पुष्पें फळें येती ।
नाना जीव खाऊन जाती ।
ते जीव मरतां जगती ।
नेमस्त होये ।।
।। जय जय रघुवीर समर्थ ।।
दासबोध : १५/०४/१५-१६
प्रत्येक ठिकाणच्या पाण्याला एक वेगवेगळा परंतु विशिष्ट असा गंध येत असतो. तो गंध त्या ठिकाणच्या पृथ्वीचा म्हणजे मातीचाच असतो. ते पाणी कालांतराने आटून जाते मग ती माती पुन्हा पृथ्वीच होऊन जाते.
याच पृथ्वीवर अनेक झाडे उगवतात. त्यांची पाने, फळे, फुले खाऊन जगणारे असंख्य कृमी कीटक पक्षी असतात. या पशु पक्ष्यांचे जीवन संपुष्टात आल्यावर ते जगती म्हणजे
पृथ्वीवरच पडतात आणि मातीशी एकरूप होऊन जातात. देह अंती पृथ्वीशी एकरूप होतो म्हणून मृत शरीराला पार्थिव असे म्हणतात.
माती असशी मातीस मिळसी. हेच अंतिम सत्य आहे.
शाश्वतब्रह्मनिरूपण समास.
🙏 💐💐💐💐 💐 🙏


0 टिप्पण्या