🌞 दिन विशेष 🌞
इसवी सन २०२३ - २२ ऑगष्ट
शालिवाहन शक १९४५, विक्रम संवत २०७९
भा. रा. ३१ श्रावण १९४५.
युगाब्द ५१२५
संवत्सर नाम : शोभन
अयन : दक्षिणायन
ऋतू : वर्षा
मास : निज श्रावण
पक्ष : शुक्ल
तिथी : षष्ठी (२७.००) ~ सप्तमी
वार : मंगळवार
नक्षत्र : चित्रा (०६.३०) ~ स्वाती
राशी : तुला
*मंगळागौरी पूजन*
श्रियाळ षष्ठी
सुपोदान वर्ण षष्ठी
कल्कि जयंती
*एकनाथजी रानडे पुण्यस्मरण*
*मद्रास दिन*
१६३९: ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी ने मद्रास (आताचे चेन्नई) शहराची सुरूवात केली.
१८४८: अमेरिकेने न्यू मेक्सिको हा प्रांत ताब्यात घेतला.
१९०२: कॅडिलॅक मोटर कंपनीची स्थापना.
१९६२ : फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष चार्ल्स द गॉल यांची हत्या करण्याचा कट फसला.
१९७२ : वर्णद्वेषी धोरणाबद्दल र्होडेशिया (झिम्बाब्वे) ची आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीतून हकालपट्टी करण्यात आली.
२०१८: भारतीय नेमबाज राही सरनोबत यांनी 25 मीटर पिस्तूल शूटिंगमध्ये सुवर्णपदक मिळवून आशियाई खेळांच्या नेमबाजी स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले. अशी कामगिरी करणाऱ्या ती पहिली भारतीय महिला ठरली.
जन्मदिवस
१६४७: प्रेशर कुकर चे निर्माते डेनिस पेपिन
१९०४ : डेंग जियाओ पिंग – सुधारणावादी चिनी नेते
१९१५: शंभू मित्रा, अभिनेता व नाटककार
१९१५: इलेक्ट्रॉनिक सूक्ष्मदर्शकाचे रचनाकार जेम्स हिलियर.
१९१८ : डॉ. बानू कोयाजी – कुटुंबनियोजनाच्या क्षेत्रात सलग साठ वर्षे कार्य करणार्या सामाजिक कार्यकर्त्या. त्यांना पद्मभूषण, रॅमन मॅगसेसे पुरस्कार, रामेश्वरदास बिर्ला राष्ट्रीय पुरस्कार, पुण्यभूषण पुरस्कार, पुणे विद्यापीठातर्फे डॉक्टर ऑफ लेटर्स (१९५५) इ. पुरस्कारांनी गौरविण्यात आले. पुण्यातील के. इ. एम. रुग्णालय, जहांगीर नर्सिंग होम, दै.सकाळ, इंडिया फांउंडेशन इ. संस्थांशी त्यांचा निकटचा संबंध होता.
१९१९: गिरीजाकुमार माथूर – साहित्य अकादमी पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध भारतीय हिंदी लेखक व कवी.
१९२०: हृदयरोपण शस्त्रक्रियेचा पाया घालणारे अमेरिकन शल्यविशारद डॉ. डेंटन कुली
१९३५: पंडित गोपीकृष्ण – कथ्थक नृत्यशैलीचे बनारस घराण्याचे नर्तक, नृत्यदिग्दर्शक व अभिनेते. भरतनाट्यम, कथकली, मणिपुरी आदी नृत्यप्रकारांतही त्यांनी नैपुण्य मिळवले होते. १९५७ मध्ये त्यांनी ८२ दिवसांत ८७ कार्यक्रम करुन विक्रम केला.
१९५५: चिरंजीवी, अभिनेता व राजकारणी
मृत्यूदिन
१८१८ : वॉरन हेस्टिंग्ज – भारताचा पहिला गव्हर्नर जनरल
१९६७: जन्म नियंत्रण गोळीचे निर्मिते ग्रेगरी गुडविन पिंटस
१९८०: किशोर शाहू, अभिनेता व निर्माते, दिग्दर्शक. यांचे बँकॉक विमानतळावर विमानात चढत असताना हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.
१९८०: मॅकडोनेल विमानाचे निर्माते जेम्स स्मिथ मॅकडोनेल. F series फायटर विमानाचे मूळ निर्माते.
१९८२: एकनाथजी रानडे, क्रांतिकारक, स्वातंत्र्य सैनिक, कन्याकुमारी येथील स्वामी विवेकानंद स्मारकाचे व सामाजिक सेवाकार्याचे प्रणेते व योजक. अधिकाधिक लोकांचा सहभाग असावा म्हणून मोठमोठ्या देणग्या जमा न करता एक एक रुपया जमा करुन त्यांनी विवेकानंद स्मारकाचे प्रचंड काम उभे केले. देशातील सर्वच दुर्गम भागात विशेषतः ईशान्य भारतात त्यांची प्रशंसनीय सेवाकार्य चालतात.
१९८९ : पं. कृष्णराव शंकर पंडित – ग्वाल्हेर घराण्याचे शास्त्रीय गायक. राष्ट्रपती डॉ. राजेन्द्रप्रसाद यांनी त्यांचा ’राष्ट्रीय गायक’ म्हणून गौरव केला होता.
१९९५: संगीतकार, ट्रम्पेट, व्हायोलिन वादक पं. रामप्रसाद शर्मा. ‘लक्ष्मीकांत-प्यारेलाल‘ या जोडीतील प्यारेलाल यांचे ते वडील.
१९९९: सूर्यकांत मांढरे तथा सूर्यकांत, सुप्रसिद्ध अभिनेता
२००१: शरद तळवलकर –आपल्या सदासतेज अभिनयाने मराठी रसिकांच्या मनावर प्रदीर्घकाळ प्रसन्नतेचे अधिराज्य गाजवणारे विनोदी कलाकार.
*।। दास-वाणी ।।*
वल्लीमधे जळ संचरे ।
कोरडेपणें हें वावरे ।
वोलेंवाचून न थिरे ।
कांही केल्यां ।।
झाडांमधें केलीं आळीं ।
झाडे धांवती निराळी ।
कित्येक झाडें अंतराळीं ।
उडोन जाती ।।
।। जय जय रघुवीर समर्थ ।।
दासबोध : १५/०५/१०-११
जाई जुई सारख्या वेलींमधे पुष्कळ प्रमाणात पाणी असते. वरून मात्र हया वेली कोरडया दिसतात. खरे तर पाण्यावाचून कोणत्याही वेली वृक्षांना थार नाहीच. जलतत्वाशिवाय त्या जगूच शकणार नाहीत.
झाडांना आळी म्हणजे पाणी टिकण्यासाठी गोल भरीव बंधारे करून त्यांमधे नियमीत पाणी घातले तर ती झाडे उंच उंच वाढतात. आजूबाजूला पसरतातही. कित्येक झाडांच्या खोडावर किंवा शेंडयांवर अजून वेगवेगळी बांडगुळे वाढतात. त्यांनाही मूळ झाडापासूनच पाणी मिळत जाते. थोडक्यात जलतत्वाशिवाय जीवसृष्टी तगत नाही. म्हणूनच पाण्याला जीवन हेही एक नाव आहे.
चंचळलक्षण समास.
🙏 💐💐💐💐 💐 🙏


0 टिप्पण्या