गौतम सोनवणे जिल्हा विशेष प्रतिनिधी औरंगाबाद
मो.8308128457,
औरंगाबाद :-पैठण तालुक्यातील लोहगाव येथे विद्युत तारेवरील लटकलेला कावळा काढताना विजेचा जोराचा धक्का लागुन एका वायरमनचा मृत्यु झाला.हि घटना पैठण तालुक्यातील लोहगाव येथे दि.२९/८/२०२३ वार मंगळवार रोजी सकाळी घडली.श्रीपाद राजाराम भोंडे (वय ३५) रा.पाटेगाव ता.पैठण.जि.औरंगाबाद असे मृत्यु झालेल्या वायरमनचे नाव आहे.या बाबत सविस्तर माहिती अशी आहे की,लोहगाव येथे विद्युत तारेवर कावळा अटकला होता,त्यामुळे संभाव्य धोका टाळण्यासाठी लोहगाव महावितरण येथे कार्यरत आसलेले वायरमन श्रीपाद भोंडे यांनी लोखंडी राॅडच्या साहाय्याने तारेवर लटकलेला कावळा काढत होते.यावेळी त्यांना विजेचा जोराचा धक्का लागला,त्यांना ग्रामस्थांनी बिडकीन येथील शासकीय रुग्णालयात नेले असता परंतु तेथील वैद्यकीय अधिकारी यांनी तपासुन मृत घोषित केले. बिडकीन पोलीस ठाणेचे सहाय्यक पोलीस निरिक्षक गणेश सुरवसे व महावितरणचे कार्यकारी अभियंता विष्णु ढाकने,आणि ढाकेफळ विभागाचे तावरे यांनी रुग्णालयात जाऊन पंचनामा केला.आणि वैद्यकीय अधिकीय यांनी पोष्टमार्टम करुन त्यांच्या गावी पाटेगाव ता.पैठण येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.बिडकीन पोलीस ठाणेचे सहाय्यक पोलीस निरिक्षक गणेश सुरवसे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार सोमनाथ तांगडे,व सोकटकर हे पुढील तपास करत आहे.


0 टिप्पण्या