Ticker

6/recent/ticker-posts

पीडित मुलाला न्याय द्या अन्यथा रस्त्यावर उतरू

पंकज गायकवाड युवक तालुकाध्यक्ष,पैठण वंचित बहुजन आघाडी........

गौतम सोनवणे जिल्हा विशेष प्रतिनिधी औरंगाबाद
मो.8308128457,

औरंगाबाद :-पैठण दि.२९/८/२०२३ मंगळवार रोजी वंचित बहुजन युवा आघाडी  तर्फे राज्य गृहमंत्री यांना तहसीलदार तहसील कार्यालय पैठण मार्फत निवेदन सादर करण्यात आले त्यामध्ये हरेगाव ता. श्रीरामपूर घडलेल्या जातीय मानसिकतेच्या क्रूर कृतीचा वंचित बहुजन आघाडी सर्वप्रथम निषेध व्यक्त करते. सदरील गावातील गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी युवराज गलांडे, नानासाहेब गलांडे व सहकारी मनोज बोडखे, पप्पू पारखे, दीपक गायकवाड, दुर्गेश वैद्य व राजू बोरगे यांनी अतिशय नीच मानसिकतेतून शुभम मागाडे या तरुणाला जेवण करत असताना उचलून निर्जनस्थळी शेतात नेले. कबुतर, शेळी चोरण्याचा व विकण्याचा आरोप करत शुभम याला अर्धनग्न करून झाडाला दोरीने हात व पाय बांधून उलटे टांगले. त्याच्या अंगावर लघुशंका केली, त्याला थुंकून चाटायला लावले, जातीवाचक शिवीगाळ केली व मारहाण करत होते. सदरील घटना महाराष्ट्राला काळीमा फासणारी असून दिवसेंदिवस जातीय अत्याचाराच्या घटना वाढत असून राज्याला दलीत-मुस्लिम व बहुजनांवर अत्याचार करणारे राज्य घोषित करण्यात यावे. आपल्या देशात व राज्यात दलीत-मुस्लिम व बहुजन सुरक्षित नाही .वंचित बहुजन युवा आघाडी पैठण तर्फे आपल्याला विनंती करण्यात येते की आपण सदरील घटनेत गांभीर्याने दखल घेऊन पीडित शुभम यास न्याय द्यावा जातीय द्वेषातून झालेल्या मानहानिबाबत सकारात्मक पाऊले उचलून मनुवादी विचारसरणीच्या गावगुंडांना योग्य कारवाई करून कडक शिक्षा द्यावी. अन्यथा पक्षाच्या वतीने रस्त्यावर उतरु

यदाकदाचित आपली भूमिका न्याय देण्याची नसेल तर राज्यातील सुजाण नागरिक कायदा आपल्या हातात घेईल अशी परिस्थिती आपण निर्माण केली आहे. निवेदन माध्यमातून करण्यात आलेल्या मागण्या पूर्ण करावी ही विनंती. सदरील विषयातील न्यायासाठी पक्ष अध्यक्ष आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली मोठे आंदोलन निदर्शन करण्यात येईल याची नोंद घ्यावी. असा इशारा देण्यात आला.

त्यावेळी युवक तालुकाध्यक्ष पंकज गायकवाड, तालुकाध्यक्ष सुनील साळवे,  तालुका उपाध्यक्ष कलीम पठाण, तालुका महासचिव कृष्णा राजगुरू,  नवनाथ घायतडक, ज्योतीराम वावळ, आदर्श दळवी, बाळू वाहुळे, प्रदीप वावळ ,सिद्धार्थ निकाळजे, अविनाश निकाळजे, अतुल मगरे, व सर्व आजी-माजी कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या