Ticker

6/recent/ticker-posts

सेलोटी येथे पत्नीची हत्या करून पतीचीही आत्महत्या


• उपचारादरम्यान पत्नीचा मृत्यू 

• बंधाऱ्यातील पाण्यात पतीचा मृतदेह आढळला 

कालिदास खोब्रागडे जिल्हा विशेष प्रतिनिधी भंडारा मो.9545914324

भंडारा :- क्षुल्लक कारणावरून भांडण झाल्याने राग अनावर होऊन पतीने पत्नीवर प्राणघातक हल्ला केल्याने उपचारादरम्यान मंगळवारी(ता.२९) सायंकाळी ६:०० वाजता नागपूर येथे पत्नीचा मृत्यू झाला. पोलिस आपल्याला पकडतील या भीतीपोटी गावालगत बंधाऱ्यातील पाण्यात उडी घेऊन पतीनेही आत्महत्या केल्याची घटना बुधवारी(ता.३०) सकाळी ११:३० वाजता दरम्यान उघडकीस आली. मृतक पत्नीचे नाव भारती भरत चाचेरे(४०) तर पतीचे नाव भरत दशरथ चाचेरे(४५), दोघेही रा. सेलोटी, तालुका लाखनी अशी आहेत. कौटुंबिक कलहाचा काय परिणाम होतो. हे या घटनेवरून दिसून येते. 
               चाचेरे कुटुंबीय परमात्मा एक सेवक असून पतीस दारू चे व्यसन जडल्यामुळे पती पत्नी मध्ये लहान-सहान कारणावरून नेहमीच झगडा भांडण होत असे. मंगळवारी पहाटेचे सुमारास कुटुंबीय झोपून उठले असता भारती घराबाहेर असलेल्या चुलीजवळ बेशुद्धावस्थेत पडलेली दिसून आली. तर तिच्या डोक्याचे मागील भागातून रक्तस्त्राव होत होता व जवळ असलेल्या लाकडी पाटाला रक्त लागलेला दिसून आला. पण पती घरी नसल्यामुळे त्यानेच प्राणघातक हल्ला करून पळून गेला असावा. असे समजून दिराने तिला उपचारासाठी लाखनी च्या एका खासगी दवाखान्यात भर्ती केले. प्रकृती अत्यवस्थ असल्यामुळे तीचेवर प्रथमोपचार करून तिला सामान्य रुग्णालय भंडारा नंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर येथे उपचारासाठी पाठविण्यात आले. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. 
               रागाच्या भरात पतीने पत्नीवर प्राणघातक हल्ला केला. पत्नीचा मृत्यू झाल्याचे समजून तो घाबरून इतरत्र निघून गेला असला तरी पोलिस पथक त्याच्या शोधार्थ इतरत्र रवाना करण्यात आले. तथा शोध घेणे सुरू होते. पण बुधवारी सकाळी ११:३० वाजता दरम्यान त्याचा मृतदेह गावालगत नाल्यावरील बंधाऱ्याचे पाण्यात तरंगताना आढळून आला. घटनेची माहिती लाखनी पोलिसांना देण्यात आली. लाखनी पोलिसांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना कळविले. अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलिस अधिकारी सुशांत सिंग, पोलिस निरीक्षक मिलिंद तायडे, पोलिस अमलदार विलास खोब्रागडे, रामकृष्ण बावनकुळे, चालक स्वप्नील काहालकर यांनी घटनास्थळी भेट देऊन ग्रामस्थ व नातेवाईकांचे मदतीने मृतदेह पाण्याबाहेर काढून पंचनामा केला व उत्तरीय परिक्षणासाठी ग्रामीण रुग्णालय लाखनी येथे पाठविला. शव परिक्षणानंतर मृतदेह नातेवाईकांचे ताब्यात देण्यात आला. पत्नीवर प्राणघातक हल्ला करून मेल्याचे समजून घरून निघून गेला. पण राग शांत झाल्यावर पोलिस आपल्याला पकडतील ह्या भीतीपोटी बंधाऱ्यातील पाण्यात उडी घेऊन आत्महत्या केल्याच्या गावात चर्चा होत असल्या तरी शव विच्छेदन अहवालानंतरच मृत्यूचे कारण कळेल. मृतक पती पत्नीवर एकाच वेळी स्थानिक स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत असली तरी त्यांची २ अपत्य अनाथ झाली आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या