Ticker

6/recent/ticker-posts

अस्थायी उपहार गृहातील साहित्य जळून खाक

• लाखोरी येथील घटना

• ५५ हजाराचे साहित्य जळाले

कालिदास खोब्रागडे जिल्हा विशेष प्रतिनिधी भंडारा मो.9545914324

भंडारा :-लाखनी तालुक्यातील लाखोरी येथे बस स्थानक परिसरात रस्त्याच्या कडेला अस्थायी उपहार गृहास अचानक आग लागल्याची घटना बुधवारी(ता.३०) मध्यरात्रीच्या सुमारास उघडकीस आली. त्यात ५५ हजार ४०० रुपयाचे साहित्याचे नुकसान झाल्याचा तलाठी प्रियंका सांगोळकर यांनी पंचनाम्यात अंदाज वर्तविला आहे. नुकसानग्रस्त महिला उपहार गृह चालकाचे नाव सिंधू मनोहर मते(६०) रा. लाखोरी असे आहे. 
              नुकसानग्रस्त महिला अत्यल्प भूधारक शेतकरी असून शेतीस जोडधंदा म्हणून त्या अस्थायी उपहार गृह चालवीत असत. नेहमी प्रमाणे मंगळवारी रात्री ८:०० वाजता चे सुमारास दुकान बंद करून घरी गेल्या. कुटुंबियासोबत जेवण करून झोपी गेल्या. रात्रीचे सुमारास दुकानाचे आजूबाजुस पाइपलाइन दुरुस्तीचे काम सुरू होते. कामावर मजूर आणि सरपंच उपस्थित होते. बंद दुकानातून आगीच्या ज्वाला दिसून येताच सरपंच सुधीर चेटुले यांनी नुकसानग्रस्त उपहार गृह संचालिकेच्या कुटुंबियास घटनेची माहिती दिली. तसेच लाखनी पोलिस व तलाठी सेलोटी यांनाही कळविण्यात आले. पोलिस आणि तलाठी प्रियंका सांगोळकर घटनास्थळी आले. पोलिस पाटील निरु गिरेपुंजे, तंमुस अध्यक्ष गिरिधर मते, सामाजिक कार्यकर्ता अशोक बडवाईक, सुधीर हिंगे, रामभाऊ बुराडे, सुरेश चौरे यांचे समक्ष नुकसानीचा पंचनामा करण्यात आला. त्यात टेबल, खुर्च्या, ताळपत्री, सिलेंडर, नाश्ता व चाय तयार करण्याचे साहित्य व कच्चा माल जळून खाक झाल्याने ५५ हजार ४०० रुपये नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात आला. नुकसानग्रस्त महिला उपहार गृह चालीकेस नुकसान भरपाई देण्यात यावी. अशी मागणी होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या