Ticker

6/recent/ticker-posts

शांतता नियोजन समितीच्या बैठकीत नागपंचमीची यात्रा उत्सवा निमित्त आनंदमेळा पहिल्याच जागेवर शांततेत पार पाडण्याचे तहसीलदार योगेश चंद्रे यांचे आव्हान...

सुजित धनवे उपसंपादक महाराष्ट्र राज्य.
मो. नं.7058137098

अहमदनगर :- जामखेडची नागपंचमीची यात्रेउत्सव प्रतिष्ठेची असून यात्रेनिमित्त भरणारा आनंदमेळा पहील्या जागेवरच होईल यासाठी आवश्यक त्या सुविधा नागरिकांना मिळण्यासाठी पोलीस प्रशासन, नगरपरिषद, आरोग्य विभाग व महावितरण यांना सर्व सुचना देण्यात आल्या आहेत. यात्रा उत्सव शांततेत पार पाडण्याची सर्वांनी जबाबदारी घेऊन सहकार्य करण्याचे आवाहन तहसीलदार योगेश चंद्रे यांनी केले आहे.
    जामखेड शहरात नागपंचमी उत्सवा निमित्ताने येथील तहसील कार्यालयात शुक्रवारी शांतता कमिटीची नियोजन बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी तहसीलदार योगेश चंद्रे बोलत होते. नागपंचमी उत्सवा निमित्ताने श्री नागेश्वराची पालखी काढण्यात येते तेथील मार्गावर येणाऱ्या समस्या, आनंद मेळा, नर्तिका डाव याठिकाणी मंडळाने स्वयसेवक नेमावे. सी सी टी व्ही कॅमेरे लावावे,  वाहन पार्किंग व्यवस्था करणे. वॉटर प्रूफ पोलीस मदत केंद्र उभारावे. व मदत केंद्रात सर्व सी सी टी व्ही चे चित्रीकरण पोलीसाना पाहता येईल असे लावावे, डोळ्याची साथ सध्या चालू आहे त्या बाबत आरोग्य विभाग यांनी योग्य नियोजन करणे, कुस्ती आखाडा ठिकाणी पार्किंग व्यवस्था व्यवस्थित ठेवावी, गुंड प्रवृत्तीचे लोक आनंद मेळावा मध्ये बाधा उपलब्ध करणार नाहीत या बाबत योग्य ते नियोजन करण्यात येऊन कारवाई करण्यात यावी, शहरातील बंद पडलेल्या स्ट्रीट लाईट चालू करून कोठेही अंधार राहणार नाही तसेच लाईट जाणार नाही या बाबत योग्य नियोजन करावे, आनंद मेळाव्याच्या ठिकाणी ॲम्बुलन्स व अग्निशामक दलाचे गाडीचे व्यवस्थापन करणे,  मोबाईल टॉयलेटची व्यवस्था करणे. पाळण्याचे दर निश्चित करावे, बाजार समितीने जागेचा लिलाव लवकर करून घेणे. यावरील सर्व विषयावर प्रशासकीय अधिकारी व शांतता कमिटी सदस्य यांची साधक बाधक चर्चा झाली. 
          या बैठकीला  मुख्याधिकारी अजय साळवे, पोलीस निरीक्षक महेश पाटील, महावितरण विभागाचे अभियंता शरद चेचर,  बाजार समितीचे सभापती शरद कार्ले, सचिव वाहेद शेख, राष्ट्रवादीचे प्रा. मधुकर राळेभात,सामाजिक कार्यकर्ते विकीभाऊ सदाफुले , शिवसेना तालुकाप्रमुख संजय काशीद, नगराध्यक्ष निखिल घायतडक,विकासतात्या राळेभात, नगरसेवक डिगांबर चव्हाण,मा. सरपंच कैलास माने सर,मंगेश आजबे, पवन राळेभात,  प्रदिप टापरे, संपत राळेभात, पांडुराजे भोसले, प्रा.विकी घायतडक , संजय कोठारी, बबन काशीद, शामिरभाई सय्यद, कुंडल राळेभात, सागर सदाफुले, सनी सदाफुले, उमर कुरेशी, गणेश आजबे, राजेश मोरे,अतिश पारवे, रवी सोनवणे, मिलिंद भोसले सह नागरीक उपस्थित होते.
( फोटो - जामखेड तहसील कार्यालयात शांतता व नियोजन बैठकीत बोलताना तहसीलदार योगेश चंद्रे यावेळी पोलीस निरीक्षक महेश पाटील, मुख्याधिकारी अजय साळवे, बाजार समितीचे सभापती शरद कार्ले आदी)

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या