Ticker

6/recent/ticker-posts

माता रमाबाई आंबेडकर विद्यार्थी वसतिगृहात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी



शेख अझहर जिल्हा प्रतिनिधी परभणी
परभणी :- शहरातील डॉ. आंबेडकर नगर येथील माता रमाबाई आंबेडकर शिक्षण प्रसारक मंडळ परभणी संचलित माता रमाबाई आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह परभणी येथे विद्यार्थी सहभागातून साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची माता रमाबाई आंबेडकर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष ऍड सुभाष अंभोरे दुधगावकर यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली वसतिगृह अधीक्षक प्रमोद अशोकराव अंभोरे यांच्या अध्यक्षतेखाली तसेच जेष्ठ पत्रकार दिलीप बनकर, शेख सरफराज यांच्या प्रमुख उपस्थितीत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून जयंती कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाची विशेष गोष्ट म्हणजे या कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन हे वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी केले होते. तसेच  उपस्थित मान्यवरांचे वसतिगृहातील विध्यार्थ्यांनी पुष्प गुच्छ देऊन सन्मानित केले. सदरील कार्यक्रमात वसतिगृहातील विध्यार्थी विनोद फुके(वर्ग 7वा), आदित्य गाढवे (वर्ग 8वा), प्रशिक वानखेडे (वर्ग 10वा) या विद्यार्थ्यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनावर प्रकाश टाकत आपले मनोगत व्यक्त केले. तसेच जेष्ठ पत्रकार दिलीप बनकर, शेख सरफराज व गजानन सुगंधे यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्व सांगून मार्गदर्शन केले. या वेळी अध्यक्षीय भाषणात प्रमोद अंभोरे यांनी जयंती कार्यक्रमाचे आयोजन करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक करून त्यांचे अभिनंदन करत शिक्षणाचे महत्व सांगून अध्यक्षीय समारोप केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वसतिगृह विध्यार्थी निखिल बेकटे (वर्ग 10वा) व सूरज थोरात (वर्ग 10वा) यांनी केले. तर आभार प्रशिक दीपके (वर्ग 9वा ) याने मानले. या वेळी वसतिगृह अधीक्षक प्रमोद अंभोरे, कर्मचारी प्रकाश वडधुतिकर, शिकवणी शिक्षक शेख अझहर, संगणक प्रशिक्षक संदीप वायवळ, लोक स्वतंत्र पत्रकार संघ तथा रुग्ण हक्क संरक्षण समितीचे जिल्हा अध्यक्ष जेष्ठ पत्रकार दिलीप बनकर, री.पा.ई. आठवले गटाचे अल्पसंख्यांक जिल्हा अध्यक्ष तथा रुग्णहक्क संरक्षण समितीचे जिल्हा उपाध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते शेख सरफराज व  भीमशाहीर सामाजिक कार्यकर्ते गजानन सुगंधे व वसतिगृहातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
    जयंती अभिवादन कार्यक्रमात लोक स्वातंत्र्य पत्रकार संघाच्या वतीने परभणी जिल्हाध्यक्ष दिलीप बनकर व शेख सरफराज यांनी उपस्थित विध्यार्थ्यांना चॉकलेट व बिस्कीट पुडे वाटण्यात आले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या