Ticker

6/recent/ticker-posts

कामठी शहर प्रभाग 15 रामगडसाहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन

राजेंद्र बावनकुळे प्रतिनिधी कामठी जिल्हा नागपूर

कामठी : - साहित्यरत्न लोकशाहिर अण्णाभाऊ साठे यांच्या 103 व्या जयंती निमित्त शाहिर राजेंद्र भिमराव बावनकुले यांनी साहित्यसम्राट लोकशाहिर अण्णाभाऊ साठे यांच्या छायाचित्रा ला माल्यार्पण करून अभिवादन केले,
साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या जीवन कार्यावर उज्वल रायबोले यांनी मार्गदर्शन केले,कुंदन सार्वजनिक वाचनालय रामगड कामठी येथे आयोजित कार्यक्रमात शाहिर राजेंद्र बावनकुले यांचा वाचनालयाचे संचालक नरेश बर्वे यांच्या हस्ते शाल श्री फल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला,यावेळी शाहीर राजेंद्र बावनकुळे,मानधन समिती सदस्य यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. प्रास्तविक शंकर चवरे यांनी तर संचालन मनोज तेलंग यानी केले आभार  दिनेश खेडकर यांनी मानले, यावेळी भाजप अनुसूचित जाती आघाडी कामठी शहर अध्यक्ष विक्की बोंबले,इंदोरा ग्राम पंचायत चे उपसरपंच वीरेंद्र सेंगर तसेच प्रज्वल सौलंकी,अभिषेक कनोजे, मिलिंद बागड़े,संतोष धुरिया,अंकित बंसोड,रोहित मेश्राम,निमिष सांगोड़े,आकाश बोंबले, महेश बावने प्रामुख्याने उपस्थित होते

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या