Ticker

6/recent/ticker-posts

बहुजन समाजाचे हित बसपा मध्ये सुरक्षित राहील

• बसपा प्रदेश प्रभारी भीम राजभर यांचे प्रतिपादन

कालिदास खोब्रागडे जिल्हा विशेष प्रतिनिधी भंडारा
मो.9545914324


भंडारा :- देशात बहुजन समाज पार्टी चे सरकार स्थापन झाल्यास ओबीसी जनगणना करू, स्वामीनाथन आयोग लागू करून सुशिक्षित बेरोजगार युवकांच्या हाताला काम देऊ. तसेच बहुजन समाजाचे प्रश्न प्राधान्याने व प्रामाणिकपणे सोडविण्यात येणार असल्यामुळे बसपा कडूनच बहुजन समाजाचे हित सुरक्षित राहणार असे बसपा चे प्रदेश प्रभारी ॲड. भीम राजभर यांची बहुजन समाज पार्टी साकोली विधानसभा तर्फे गावचालो अभियानाअंतर्गत शुक्रवारी(ता.११) रोजी विश्राम गृह लाखनी येथे समीक्षा बैठक व कार्यकर्ता संमेलनात उपस्थितांना मार्गदर्शन करतांना आपले विचार व्यक्त केले. 
              बहुजन समाज पार्टी साकोली विधानसभा तर्फे विश्रामगृह लाखनी येथे गावचलो अभियानाअंतर्गत समीक्षा बैठक व कार्यकर्ता संमेलन आयोजित करण्यात आले होते. प्रमुख मार्गदर्शक महाराष्ट्र राज्य प्रदेश प्रभारी भीम राजभर, मार्गदर्शक प्रदेशाध्यक्ष संदीप ताजने, विशेष अतिथी प्रदेश प्रभारी ॲड. सुनील डोंगरे, प्रमुख उपस्थितांमध्ये प्रदेश सचिव दिलीप मोटघरे, शंकर भेंडारकर, लोकसभा प्रभारी निमा मोहरकर, जिल्हाध्यक्ष पाम्बिर्द मोटघरे, जिल्हा प्रभारी चंद्रमणी गोंडाने, जिल्हा सचिव सोपान डिवटे, धीरज गोस्वामी, विधानसभा अध्यक्ष स्वप्नील गजभिये, विधानसभा महासचिव छोटेलाल गेडाम, विधानसभा कोषाध्यक्ष कार्तिक मेश्राम, सामाजिक कार्यकर्ता मनोज कोटांगले, प्रिय शहारे यांचे प्रमुख उपस्थितीत घेण्यात आला. 
               समीक्षा बैठकीला मार्गदर्शन करतांना प्रदेश अध्यक्ष ॲड. संदीप ताजने यांनी सांगितले की बहुजन समाज पार्टी देशात स्वबळावर लोकसभा व विधानसभा निवडणूक लढणार आहे. भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्रातील सर्व विधानसभा मतदार संघातून खासदार आमदार निवडून दिल्यास या क्षेत्राला सुजलाम सुफलाम केले जाईल. असे सांगितले. उपस्थित मान्यवरांनी पक्षाचे ध्येय धोरणाबाबद कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. सूत्र संचालन धीरज गोस्वामी तर आभार मनोज कोटांगाके यांनी मानले. बैठकीस विधानसभा पदाधिकारी, सेक्टर बूथ कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते. समीक्षा बैठकीच्या यशस्वितेसाठी तालुकाध्यक्ष शशिकांत रामटेके, अविनाश रंगारी, देवेंद्र मेश्राम, शिलवंत तिरपुडे, शर्मिला खंडारे, योगेश कांबळे, दिलीप वाघमारे, अश्विनी लेंडारे यांनी अथक परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या