Ticker

6/recent/ticker-posts

निवृत्तीला आलेल्या शिक्षकांनीच विद्यार्थिनीशी केले अश्लील चाळे

साकोली पोलिसांनी पोस्को अंतर्गत शिक्षकाला केली अटक

मुलीने घरी जाऊन आजीला शाळेत घडलेली संपूर्ण घटना दिली सांगून

भवन लिल्हारे कार्य. संपादक ( चित्रा न्युज महाराष्ट्र राज्य ) मो.नं.9373472847

भंडारा : भंडारा जिल्हा साकोली तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील एका शिक्षकाने नऊ वर्षीय मुलीशी अश्लील चाळे केल्याची खळबळ उडाली आहे. शिक्षक पेश्यावर काळीख पोतल्याची ही घटना उघडकीस आली आहे. यात मुलीच्या आजीने केलेल्या तक्रारीवरून साकोली पोलिसांनी पाेक्साेअंतर्गत शिक्षकाला अटक देखील केली आहे. 
अटक झालेले आरोपी नामे देवराम लक्ष्मण पटले ( वय ५६ वर्षे ) असे अटक केलेल्या शिक्षकाचे नाव आहे. शाळेत खेळ शिकवत असताना मुलीच्या नको असणाऱ्या शरीराच्या भागाला स्पर्श केल्याने मुलगी ओरडली. मुलीने घरी जाऊन आजीला शाळेत घडलेली घटना सांगितली. एक महिन्यापूर्वी याच शिक्षकाने मुलीशी ऑफिसमध्ये कार्यालयात एकटीलाच बोलवून अत्यंत घाणेरड्यारितीने अश्लील चाळे केले होते. पुन्हा या घटनेची पुनरावृत्ती झाल्याने मुलीच्या आजीने साकोली पोलिस ठाण्यात ५ ऑगस्टला २०२३ रोजी घटनेची तक्रार दिली. शिक्षक देवराम लक्ष्मण पटले या शिक्षकावर कलम ३७६ (२)जे, एफ सहकलम ४,६,८,१० व पाेक्साेअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे . तपास सहायक पोलिस निरीक्षक संजय खोकले करीत आहेत. ही शाळा एक शिक्षकी असून पहिली ते चौथीपर्यंत केवळ बरेच विद्यार्थी आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या