प्रवीण शेंडे जिल्हा प्रतिनिधी गोंदिया ग्रामीण
मो.9834486558
तिरोडा-तुमसर रस्त्यावरील बिरसीफाटा फाट्याच्या मुख्य चौकात असलेल्या बरेवार मेडिकल स्टोअर्ससमोर विरुद्ध दिशेने येणाऱ्या कंटेनरने तिरोडाहून भंडारा येथे जाणाऱ्या एसटी बसला धडक दिली.
मिळालेल्या माहितीनुसार सकाळी
आज सकाळी नऊच्या सुमारास एसटी बस क्र. एमएच 40 एन 8089 तिरोडा येथून भंडारा नवेझरी मार्गाने जात होते. विरुद्ध दिशेने येणाऱ्या कंटेनर क्र.MH31 FC7013 वर धडकली. घटनेच्या वेळी बसमध्ये ५ प्रवासी होते, असे सांगण्यात आले. सर्व प्रवासी सुखरूप आहेत. चालक-वाहकालाही कोणतीही दुखापत झाली नाही.


0 टिप्पण्या