Ticker

6/recent/ticker-posts

💐 || सुमंगल सुप्रभात || 💐‌ 🌞 दिन विशेष 🌞

💐  || सुमंगल सुप्रभात ||  💐
‌          🌞 दिन विशेष  🌞
‌
‌इसवी सन २०२३ - १३ ऑगष्ट
‌शालिवाहन शक १९४५, विक्रम संवत  २०७९
‌भा. रा. २२ श्रावण १९४५.
युगाब्द ५१२५
संवत्सर नाम : शोभन
अयन : दक्षिणायन
ऋतू :   वर्षा
मास :  अधिक श्रावण  
पक्ष :   कृष्ण         
तिथी : द्वादशी (०८.२०) ~ त्रयोदशी                  
वार :   रविवार 
नक्षत्र : आर्द्रा (०८.२०) ~ पुनर्वसु                         
राशी :   मिथुन

*प्रदोष*

*आचार्य अत्रे जन्मदिवस* 
*महाराणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुण्यस्मरण* (दिनांकानुसार)
*मॅडम भिकाईजी रुस्तुम कामा स्मृतीदिन* 

आंतरराष्ट्रीय डावखुरे दिन

१६४२: क्रिस्टियन हायगेन्स या शास्त्रज्ञाने मंगळाच्या दक्षिण ध्रुवावरील बर्फाच्या टोप्यांचा शोध लावला.
१८९८:कार्ल गुस्ताव्ह विट याने 433 Eros या पृथ्वीजवळच्या पहिल्या लघुग्रहाचा शोध लावला.
१९१८: बायरिसचे मोटेर्न वेर्के एजी (बी.एम.डब्ल्यू.) ही सार्वजनिक कंपनी म्हणून स्थापन झाली.
१९६१: आपल्या नागरिकांचे पश्चिम जर्मनीत होणारे स्थलांतर रोखण्यासाठी पूर्व जर्मनीने आपल्या सीमा बंद केल्या. बर्लिनची भिंत बांधण्यास सुरूवात झाली.

जन्मदिवस :
१८८८: स्कॉटिश अभियंता आणि दूरचित्रवाणी (Television) चे संशोधक जॉन लोगे बेअर्ड
१८९०:त्र्यंबक बापूजी ठोंबरे तथा ’बालकवी’ – १९०७ साली जळगाव येथे भरलेल्या पहिल्या कविसंमेलनात , वयाच्या १७ व्या वर्षी त्यांनी केलेल्या कवितावाचनाने प्रभावित होऊन संमेलनाचे अध्यक्ष कान्होबा रणछोडदास कीर्तिकर यांनी त्यांना ’बालकवी’ ही उपाधी देऊन त्यांचा गौरव केला. 
१८९८:प्रल्हाद केशव तथा आचार्य अत्रे – लेखक, कवी, शिक्षणतज्ञ, संपादक, राजकीय नेते, चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, पटकथालेखक आणि वक्ते 
१८९९:सर अल्फ्रेड हिचकॉक – चित्रपट दिग्दर्शक
१९०६: विनायक चिंतामण तथा विश्राम बेडेकर – लेखक व दिग्दर्शक 
१९३६:वैजयंतीमाला बाली ऊर्फ ’वैजयंतीमाला ’ – चित्रपट अभिनेत्री
१९६३: श्रीदेवी, सिने अभिनेत्री
१९८३: संदीपन चंदा – भारताचा ९ वा ग्रँडमास्टर

मृत्यूदिन :
१७९५:महाराणी अहिल्याबाई होळकर माळवा संस्थानाच्या महाराणी – देशातील अनेक महत्त्वाच्या तीर्थक्षेत्रातील देवळांचा त्यांनी जीर्णोद्धार केला. 
१८२६: स्टेथोस्कोप चे शोधक रेने लायेनेस्क
१९१०:आधुनिक शुश्रूषा शास्त्राचा (नर्सिंग) पाया घालणार्‍या ब्रिटिश परिचारिका फ्लॉरेन्स नायटिंगेल.  १९०७ मधे त्यांना ’ऑर्डर ऑफ मेरिट’ हा किताब बहाल करण्यात आला. ’नोटस ऑफ नर्सिंग’ हा त्यांचा ग्रंथ नावाजलेला आहे.
१९१७: आंबवण्याच्या प्रक्रियेसंबंधी केलेल्या संशोधनाबद्दल नोबेल पारितोषिक मिळवणारे जर्मन रसायनशास्त्रज्ञ एडवर्ड बकनर 
१९३६:मॅडम भिकाजी रुस्तुम कामा – या भारतीय क्रांतिकारक महिला व परदेशातील भारतीय क्रांतिकारकांच्या आधारस्तंभ होत्या. १९०७ मधे जर्मनीत भरलेल्या आंतरराष्ट्रीय समाजवादी परिषदेत ब्रिटिशांच्या विरोधाला न जुमानता त्यांनी भारतीय स्वातंत्र्यासंबंधी प्रस्ताव मांडला. त्याच वेळी भारतीय स्वातंत्र्याचे प्रतीक म्हणून ’वंदे मातरम’ हा मंत्र असलेला तिरंगी ध्वज त्यांनी फडकावला.
१९४६:एच. जी. वेल्स – विज्ञानकथांसाठी प्रसिद्ध असलेले इंग्लिश लेखक 
१९८०:पुरुषोत्तम भास्कर तथा पु. भा. भावे – अष्टपैलू आणि प्रतिभासंपन्न साहित्यिक
१९८५:जे. विलार्ड मेरिऑट – मेरिऑट कॉर्पोरेशनचे संस्थापक 
१९८८:गजानन जागीरदार – चित्रपट निर्माते, दिग्दर्शक व अभिनेते
२०००:नाझिया हसन – पाकिस्तानी पॉप गायिका 
२०१५: हिरो सायकलचे सहसंस्थापक ओम प्रकाश मंजाल 
२०१६: भारतीय हिंदू नेते प्रमुख स्वामी महाराज

*।। दास-वाणी ।।* 

आपणास शाहाणें करूं नेणे । 
आपले हित आपण नेणे । 
जनी मैत्री राखों नेणे । 
वैर करी  ।। 

ऐसे प्रकारीचे जन । 
त्यास म्हणावें अज्ञान । 
तयापासीं समाधान । 
कोण पावे  ।। 

।। जय जय रघुवीर समर्थ ।। 
 दासबोध : १४/०६/२९-३० 

ज्ञान प्राप्ती करून जो स्वत:ला शहाणा करू इच्छित नाही. लोकांशी मिळून मिसळून राहाण्यातच आपले हित आहे हे ज्याला समजत नाही. विनाकारणच सगळयांशी वैरभाव धरून भांडण उकरून काढतो.

अशा प्रकारच्या चातुर्यहीन करंटयांना अज्ञानी किंवा अडाणी ही संज्ञा आहे. ते स्वत: तर समाधानी नसतातच परंतु इतर कोणालाही त्यांच्या सहवासात आनंद किंवा शांती लाभू शकत नाही. समाजामध्ये अशाच लोकांचे प्राबल्य जास्त असल्याने सार्वत्रिक अशांततेचे वातावरण असते.

चातुर्यलक्षण समास.

  🙏 💐💐💐💐💐 🙏

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या