Ticker

6/recent/ticker-posts

अट्टल घरफोड्यांना लाखनी पोलिसांनी केले जेरबंद

• केसलवाडा/वाघ घरफोडीत होता सहभाग 

• कामठी, जि. नागपूर येथून आवळल्या मुसक्या

कालिदास खोब्रागडे जिल्हा विशेष प्रतिनिधी भंडारा मो.9545914324

भंडारा:- घरी कुणीही नसल्याचा सूना मौका पाहून आरती मिलिंद मेश्राम केसलवाडा/वाघ(फाटा) यांचे घरी घरफोडी करून अडीच महिन्यापूर्वी १ लाख १८ हजार रुपयाचे सोन्याचे दागिने व मोबाईल लंपास केला होता. पण काही दिवसांनी मोबाईल चा वापर होत असल्याचे तपास पथकाचे निदर्शनास येताच पोलिस निरीक्षक मिलिंद तायडे यांनी सायबर सेल ची मदत घेऊन तांत्रिक तपासाचे आधारे अब्दुल रहमान अन्सारी(१९) आणि मोहम्मद शाहरुख अन्सारी(३३) रा. कामठी, जिल्हा नागपूर यांना जेरबंद केल्याने अनेक गुन्ह्याचा छडा लागणार असल्यामुळे लाखनी पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे. 
              आरती मिलिंद मेश्राम केसलवाडा/वाघ(फाटा) ह्या १७ जून चे सायंकाळपासून १८ जून चे रात्री ९ वाजता पर्यंत कामानिमित्त बाहेर गावी असल्याची संधी साधून चोरट्यांनी त्यांचे घराचा ऑटोमॅटिक ताला तोडून घरात प्रवेश करून २ सोन्याचे गोफ, सोन्याचा मंगळसूत्र व सोन्याचा लटकन आणि रेडमी कंपनी चा जुना मोबाईल असा १ लाख १८ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची त्या घरी आल्यावर निदर्शनास आल्याने लाखनी पोलिस ठाण्यात जाऊन फिर्याद दिली. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिस निरीक्षक मिलिंद तायडे यांनी घटनास्थळ गाठून श्वान पथक व ठसे तज्ञांना पाचारण केले. पण काही उपयोग झाला नसल्यामुळे घरफोडी उघड करण्याचे मोठे आव्हान पोलिसांपुढे होते. तरीही न डगमगता तपास अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष चीलांगे गुन्ह्याचा छडा लावण्याचे उद्देशाने तपास काम करीत होते. 
                २ महिन्यानंतर अपराध क्रमांक २३१/२०२३ मधील मोबाईल कोणीतरी वापर करीत असल्याचे समजताच पोलिस निरीक्षक मिलिंद तायडे यांनी पोलिस अधीक्षक लोहित मतानी, अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलिस अधिकारी सुशांत सिंग यांचे मार्गदर्शनात सायबर सेल च्या मदतीने मोबाईल ट्रेस करण्याचे प्रयत्न सुरू होते. पोलिस निरीक्षक मिलिंद तायडे यांचे मार्गदर्शनात सपोनि आशिष चीलांगे, पोलिस उपनिरीक्षक नितीन सूर्यवंशी, पोलिस अमलदार क्रांतीस कराडे, नरुले यांचे पथकास चोरट्यांचे मागावर पाठविण्यात आले. सावज दृष्टी पथात येताच पोलिस पथकाने मंगळवारी(ता.२९) मध्यरात्रीच्या दरम्यान अब्दुल रहमान अन्सारी(१९), मोहम्मद शाहरूख अन्सारी(३३) यांच्या कामठी, जिल्हा नागपूर येथे मुसक्या आवळल्या. तर त्यांचा एक साथीदार फरार असल्याचे विश्वसनीय वृत्त असले तरी या आरोपी कडून अनेक घरफोड्यांची माहिती मिळणार असल्याने असल्याने लाखनी पोलिसांचे कौतुक होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या