Ticker

6/recent/ticker-posts

दिघोरी येथे निवडणुकीने तंमुस अध्यक्षाची निवड

• नरेंद्र लांबकाने सातव्यांदा तंमुस अध्यक्ष पदी विराजमान

कालिदास खोब्रागडे जिल्हा विशेष प्रतिनिधी भंडारा मो.9545914324

भंडारा :- आपसी सहमतीने गावातील लहान सहान भांडणतंट्याचे गावातच निराकरण करावे. हे तंटामुक्त समितीचे प्रमुख काम असताना तंमुस अध्यक्ष निवडीसाठी निवडणुकीचा आश्रय घ्यावा लागतो. याचा प्रत्यय दिघोरी येथे आला. निवडणुकीने नरेंद्र दुर्योधन लांबकाने यांची महात्मा गांधी तंटामुक्त गाव समिती अध्यक्ष पदी सातव्यांदा निवड करण्यात आली आहे. 
            दिघोरी ग्रामपंचायतीत सरपंच शरद इटवले यांचे अध्यक्षतेखाली ग्रामसेवक मंगला येरने, उपसरपंच संध्या कुळमते, ग्रामपंचायत सदस्य तुलसीदास हलमारे, धनराज मेश्राम, आशिष खोब्रागडे, सदस्या नाजूक जांभूळकर, संगीता शेंडे, रत्नमाला खोब्रागडे, सेवानिवृत्त नायब तहसीलदार बाबुराव लांबकाने, माजी सरपंच पुरुषोत्तम हलमारे, सामाजिक कार्यकर्ता भीमराव देशपांडे, आत्माराम खोब्रागडे, गिरिधारी लांबकाने, सुकराम निरगुळे, आशा सेविका प्रभा कळपते, कृषी सहाय्यक पडोळे, अंगणवाडी सेविका अर्चना हलमारे, पाणी पुरवठा कर्मचारी राधेश्याम निरगुळे, अस्थायी कर्मचारी संगम खोब्रागडे, संदीप इटवले यांचे सह १२० ग्रामस्थांचे उपस्थितीत नुकतीच ग्रामसभा पार पडली. महात्मा गांधी तंटामुक्त गाव समिती अध्यक्षाकरिता ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. तंमुस अध्यक्ष पदाकरीता नरेंद्र दुर्योधन लांबकाने, रवींद्र खुशाल उपरिकर व रोहित भागवत लांबकाने असे ३ अर्ज प्राप्त झाले. त्यापैकी रवींद्र उपरिकर यांनी अर्ज मागे घेतला. उर्वरित २ अर्ज राहिल्याने गुप्त मतदान पद्धतीने निवडणूक घेण्यात आली. त्यात नरेंद्र लांबकाने यांना ६९ तर रोहित लांबकाने यांना ४१ मते मिळाल्याने नरेंद्र लांबकाने यांना २८ मतांनी विजयी घोषित करण्यात आले. ते सातव्यांदा तंमुस अध्यक्ष पदी विराजमान झाले आहेत. सामाजिक कार्यकर्ता लव्हा बडोले, प्रभू गायधने, देविदास शेंडे, मुरलीधर शेंडे, प्रमिला लांबकाने, रागिना शेंडे यांचे सह गावातील सर्व महिला स्वयंसहाय्यता बचत गट यांनी तंमुस अध्यक्ष नरेंद्र लांबकाने यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या