Ticker

6/recent/ticker-posts

लाखनी येथे स्व. राजीव गांधी जयंती उत्साहात

कालिदास खोब्रागडे जिल्हा विशेष प्रतिनिधी भंडारा मो.9545914324


भंडारा :- भारतीय राष्ट्रीय काँग्रेस कमिटी शाखा लाखनी तथा तालुका युवक काँग्रेसचे वतीने रविवारी (ता २०) दुपारी १२ वाजताचे सुमारास कच्छी मेमन हॉल लाखनी येथे संगणक  क्रांतीचे जनक , काँग्रेसचे प्रेरणास्रोत , माजी पंतप्रधान भारतरत्न स्व. राजीव गांधी यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जिल्हा काँग्रेस कमिटी उपाध्यक्ष अड. शफी  लद्दानी, प्रमुख अतिथी सभापती प्रणाली विजय सार्वे, जी. प. सदस्या विद्या कुंभरे, निमाचे जिल्हाध्यक्ष डॉ. चंद्रकांत निंबार्ते ,साकोली विधानसभा अध्यक्ष धनंजय तिरपुडे , माजी जी. प. सदस्य आकाश कोरे , जिल्हा महासचिव राजू निर्वाण , तालुका अध्यक्ष योगराज झलके, तालुका युवक आघाडी अध्यक्ष यशवंत खेडिकर, नगरसेवक विमुल कांबळे , बबलू निंबेकर , शहर सेवादल अध्यक्ष अनिल बावनकुळे , कनेरीच्या सरपंच लता शेंडे , सामाजिक कार्यकर्ता रुपचंद सोनवाने , रामेश्वर अंबादे, अनिकेत गोस्वामी , हेमंत  बडवाईक, यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आला .
    स्व. राजीव गांधी यांचे प्रतिमेस  माल्यार्पण करून दीप प्रज्वलनाने  अभिवादन करून जयंती उत्सवास सुरुवात करण्यात आली . मान्यवरांनी त्यांचे जीवन चरित्र व देश विकासात योगदान याबाबद सविस्तर माहिती देऊन देशासाठी  हौतात्म्य पत्करल्याच्या  घटनेचा उहापोह केला . कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका अध्यक्ष योगराज झलके, सूत्रसंचालन धनंजय तिरपुडे तर आभार यशवंत खेडीकर यांनी मानले . काँग्रेसच्या सर्व आघाड्यांचे पदाधिकारी व कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या