लिंगोजी कदम जिल्हा प्रतिनिधी ग्रामीण नांदेड
मो. 9689821132
हिमायतनगर -: तालुका सतत कोणत्या ना कोणत्या कारणावरून चर्चेत राहतो आता मात्र अतृष्टीने संपूर्ण तालुका झोडपून काढला आहे . जून मध्ये थोड्या बहुत पाऊस पडून शेतकऱ्यांना पेरणी करण्यास भाग पाडले जेमतेम शेतकरी पेरणी केली आणि पावसाने दडी मारली त्यात काही शेतकऱ्यांना दुबार पेरणीचा संकटांना सामोरे जावे लागले त्यात शेतकऱ्याची मोठे आर्थिक नुकसान झाले तरी शेतकरी राजांनी हार मानली नाही सावकारी कर्ज काढून दुबार पेरणी केली जुलैमध्ये चांगल्या पद्धतीने पावसाला सुरुवात केली शेतकरी आनंदात दिसून येऊ लागले त्यातच जुलै 19 ते 27 28 तारखेच्या पावसाने शेतकऱ्याची होती ती नव्हती झाली आज घडीला शेतकरी राजांना कोण धावून येणार लोकनेता की प्रशासक याकडे सगळ्यांचे लक्ष लागलं आहे. त्याचाच सामाजिक धडाडीचे कार्यक्षम कार्यकर्ते यांनी शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान भरपाई देण्यासाठी नवनिर्वाचित तहसीलदार यांना एका निवेदनात शेतकऱ्यांना त्यांच्या पिकाचे सरसकट पंचनामे करून हेक्टरी एक लाख रुपये मदत देण्यासाठी साहेबांनी शासन दरबारी विनंती करावी असे निवेदन सामाजिक युवा कार्यकर्ते दिनेश राठोड यांनी तहसीलदार यांच्याकडे लेखी स्वरूपात मागणी केली आहे शेतकरी अडचणीत सापडला त्याकडे कोण लक्ष देईना याचा कोणी वाली आहे का अशी शेतकरी वर्गातून चर्चा होताना दिसते .


0 टिप्पण्या