Ticker

6/recent/ticker-posts

माढ्यात वंचित बहुजन आघाडीत अनेकांचा पक्ष प्रवेश

रुपाली मेश्राम कार्य.संपादक चित्रा न्युज मो.9552073515

सोलापूर: - वंचित बहुजन आघाडी माढा लोकसभा विभागात माळशिरस येथे रिपाई गवई गटाचे राज्य सचिव जेष्ठ नेते मा. श्रीकांत सावंत, गवई गटाचे सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख मा. रमेश साळवे, गवई गटाचे सोलापूर जि उपाध्यक्ष भालचंद्र यादव, जिल्हा सचिव प्रविण वाघमारे, विझोरी शाखाध्यक्ष नानासाहेब वाघंबरे, तसेच मुस्लीम युवक सोहेल शेख, शकील आतार यांचा जाहीर प्रवेश झाला.

आदरणीय ॲड.बाळासाहेब आंबेडकर व प्रदेशाध्यक्षा मा. रेखाताई ठाकुर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून जिल्हा प्रभारी डॉ. क्रांतीताई सावंत, जि. प्रभारी प्रा. सोमनाथ साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हाध्यक्ष राहुल चव्हाण यांच्या हस्ते वंचित बहजन आघाडीत प्रवेश देण्यात आला. सदर पदाधिकार्‍यांचा प्रवेश जिल्हा कोषाध्यक्ष अभिमान जगताप, जिल्हा कायदेशीर सल्लागार ॲड सुमीत सावंत, तालुकाध्यक्ष अभिजीत गायकवाड यांच्या प्रयत्नातुन झाला.यावेळी जिल्हा उपाध्यक्ष विजय (भाऊ) कोकणे, जिल्हा उपाध्यक्ष पांडुरंग केंगार, जि कोषाध्यक्ष अभिमान जगताप, जिल्हा सल्लागार ॲड. सुमित सावंत, जिल्हा संघटक सुरेश धाईजे, तालुकाध्यक्ष अभिजीत गायकवाड, तालुका महासचिव रोहीत नवगिरे, तालुका संघटक दिपक झोडगे, प्रदिप सरवदे, प्रमोद शंकर धाईंजे युवा आघाडीचे तालुका महासचिव विकास नलावडे व अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. तळागाळातील वंचित समाजाला न्याय देण्यासाठी आणि सर्वसामान्य व्यक्तीला सत्तेपर्यंत पोहोचवण्यासाठी लोकशाही, मजबूत करण्यासाठी आणि संविधान वाचवण्यासाठी आज वंचित बहुजन आघाडी पक्षांमध्ये प्रवेश करण्यात आला.सद्यस्थितीला महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती पाहिली असता वंचित बहुजन आघाडी हाच एकमेव पक्ष सर्वसामान्यांना न्याय मिळवून देऊ शकतो,हा विश्वास समाजात निर्माण झाला आहे,त्यामुळे नवतरूण युवकांचा वंचितकडे ओढा वाढला आहे.सत्तेचे विकेंद्रीकरण आणि सामाजिकीकरण फक्त वंचित बहुजन आघाडी करू शकते,असे मत यावेळी जिल्हाध्यक्ष राहुल चव्हाण यांनी व्यक्त केले. वंचित सारे एक होऊ! सत्ता आपल्या हाती घेऊ असा नारा यावेळी देण्यात आला..

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या