संतोष मगदुम जिल्हा प्रतिनिधी ग्रामीण सांगली
मो.9146963985
सांगली :-आम आदमी पार्टी सांगलीच्या वतीने ७७ वा भारतीय स्वातंत्रदिन मोठ्या उत्साहात सांगली सिव्हील हॉस्पिटल चौकात साजरा करण्यात आला. सदर ध्वजारोहणाच्या कार्यक्रमास इक्रा उर्दू व सेमी इंग्लिश स्कूलचे हेड मास्टर श्री.असिफ शेख, मिरजेतील प्रसिध्द प्लास्टिक सर्जन डॉ.विनायक लोकरे व मराठी सिनेमा अभिनेत्री असणाऱ्या रेणु रजपूत असे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र नेते श्री.वसीम मुल्ला यांच्या मार्गदर्शनाखाली सांगली जिल्हा समितीच्या पदाधिकारी यांनी सदर कार्यक्रमाचे आयोजन केले होते. ध्वजारोहणाच्या कार्यक्रमानंतर शाळेतील विध्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमास सांगली जिल्हा शहर समितीचे श्री.आरिफ मुल्ला तसेच सांगली उपाध्यक्ष भगवान पाटील, उपाध्यक्ष विकास पाटील व सचिव नंदकुमार भोसले वाळवा तालुका, श्री.धनवडे, तानाजी जाधव व वल्लभ पाटील, सांगली शहर उपाध्यक्ष निसार मुल्ला, संभाजी मोरे, इमरान पठाण, शिवाजी गायकवाड,रवी बनसोडे, संतोष मगदूम, राम कोकरे,कृष्णा माळी, श्रीकांत चंदनवाले, तौफिक हवालदार असे पक्षाचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


0 टिप्पण्या