कालिदास खोब्रागडे जिल्हा विशेष प्रतिनिधी भंडारा मो.9545914324
भंडारा :- अमृत महोत्सवी सांगता वर्षातील स्वातंत्र्याचा ७६वा वर्धापन दिन केसलवाडा/पवार ग्रामवासी जनतेच्या वतीने उत्साहात साजरा करण्यात आला. ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच रोमीला बिसेन यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तिरुपती विद्यालयात मुख्याध्यापक जानेश येळेकर, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष अरविंद राहांगडाले यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. साने गुरुजी शाळा संकल्पनेतून बँड चे गजरात शालेय विद्यार्थ्यांची गावातून मिरवणूक काढण्यात आली. राष्ट्रगीत व महापुरुषांच्या जयघोषाने देशप्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. यावेळी पोलिस पाटील अर्चना वंजारी, उपसरपंच अनिल नंदेश्वर, ग्रामसेवक मोनाली लांडगे, ग्रामपंचायत सदस्य रामेश्वर बिसेन, अमित खेडीकर, सदस्या छन्नू रहांगडाले, वंदना नंदेश्वर, अंजीर नान्हे, कविता वलके, माजी जि. प. ज्ञानेश्वर राहांगडाले, सामाजिक कार्यकर्ता संजय बिसेन, तमुस अध्यक्ष दामोदर राहांगडाले, सोसायटी अध्यक्ष दिनेश येळेकर, पट समिती अध्यक्ष नागोपुराम, वन समिती अध्यक्ष सोमा टेंभरे, पाणी वाटप समिती अध्यक्ष नूतन ठाकरे, मुख्याध्यापक प्रमोद खेडीकर, सहाय्यक शिक्षण सिंगनजुडे, राणे, वनवे मॅडम, आशा कार्यकर्ती मंगला बिसेन, अंगणवाडी सेविका प्रतीक्षा बोपचे, मदतनीस वंदना बिसेन, ग्रामपंचायत कर्मचारी लीलाधर राहांगडाले, वनिता कावळे, रोजगार सेवक राजू उईके यांचेसह गावातील गणमान्य नागरिक, महिला-पुरुष, विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.


0 टिप्पण्या