Ticker

6/recent/ticker-posts

महिनाभरापासून कृषी पंपाचा वीज पुरवठा बंद


• लाखोरी येथील प्रकार 

• शेतकऱ्यांचे उपविभागीय अभियंत्याला निवेदन

कालिदास खोब्रागडे जिल्हा विशेष प्रतिनिधी भंडारा मो.9545914324

भंडारा :-लाखनी तालुक्यातील लाखोरी येथील एका कृषी फिडरवर ३५ ते ४० कनेक्शन असल्यामुळे वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्याने शेतकरी सिंचन सोयीपासून वंचित झाले असून महिनाभरापासून शेती पंपाची लाईट बंद असल्याने तात्काळ वीज पुरवठा सुरू करा. या करिता शेतकऱ्यांचे वतीने उपविभागीय अभियंता वीज वितरण कंपनी लाखनी यांना गुरुवारी(ता.१७) निवेदन देण्यात आले आहे. वीज वितरण कंपनीकडून काय कारवाई केली जाते. या कडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. 
           लाखोरी येथील शेतकऱ्यांना सिंचनाची सोय व्हावी. या करिता महावितरण कडून डीपी लावण्यात आली. त्यावर क्षमतेपेक्षा अधिक वीज जोडण्या झाल्याने वीज पुरवठा वारंवार खंडित होतो. त्यामुळे धान उत्पादकांना पाहिजे त्या प्रमाणात सिंचन सोयीचा लाभ घेता येत नाही. सुरळीतपणे सिंचन सुविधा व्हावी. या करिता त्याच परिसरात वीज वितरण कंपनीने दुसरी डीपी तयार केली. पण वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून परवानगी दिली गेली नसल्यामुळे दोन महिन्यांचा कालावधी लोटून सुद्धा नवीन तयार केलेली डीपी बंद आहे. त्यामुळे पर्याप्त प्रमाणात सिंचन सोय होत नसल्यामुळे रोवणी वळण्याचे मार्गावर आशेत. त्या करिता नवीन डीपी लवकरात लवकर चालू करावी. न केल्यास आपले कार्यालयासमोर आमरण उपोषणाचा इशारा निवेदनाद्वारे धान उत्पादकांनी वीज वितरण कंपनीचे उपविभागीय अभियंता लाखनी यांना दिला आहे. निवेदनावर उपसरपंच दिवाकर बांते, अंकुश कानतोडे, अशोक बडवाईक, संजय खेडीकर, युवराज वाघाते, नरेश भोयर, गणेश सावरकर, केवळराम भोयर, दिलीप कमाने, सविता बुराडे, रेखा चेटूले, मार्तंड चेटूले, सुधाकर सिंगनजुडे, मुकेश चेटूले यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या