• धाबेटेकडी येथील घटना
• पोलिसांत आकस्मिक मृत्यू ची नोंद
कालिदास खोब्रागडे जिल्हा विशेष प्रतिनिधी भंडारा मो.9545914324
भंडारा :- शेतातील विहिरीचे पाण्यात पडून युवक मृतावस्थेत पाण्यावर तरंगताना आढळून आल्याची घटना धाबेटेकडी शेतशिवारात गुरुवारी(ता.१७) सकाळी ७:३० वाजता दरम्यान उघडकीस आली. मृतकाचे नाव महेश चांगो बडोले(३०) रा. दिघोरी/नान्होरी, तालुका लाखनी असे आहे. लाखनी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून पोलिस निरीक्षक मिलिंद तायडे यांचे मार्गदर्शनात तपास सुरू आहे.
मृतक महेश हा अविवाहित असून कालपासून घरी नव्हता. तो काल(ता.१६) सायंकाळचे सुमारास धाबेटेकडी येथे दिसून आला. रात्रभर बस स्थानकात झोपलेला होता. पहाटे उठून नाश्ता केल्यानंतर गावातून दिसेनासा झाला सकाळी ७:३० वाजता दरम्यान गोपाल राजने याचा मुलगा शेतावर गेला असता त्यांचे विहिरीतील पाण्यात एक इसम मृतावस्थेत आढळून आल्याने पोलिस पाटील व गावकऱ्यांना या बाबद माहिती दिली. पोलिस पाटील पुरुषोत्तम गणवीर याने लाखनी पोलिसांना घटनेची माहिती दिली. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिस निरीक्षक मिलिंद तायडे यांचे मार्गदर्शनात पोलिस नायक श्रीकांत वाघाये सहकाऱ्यांसह घटनास्थळी गेले. गावकऱ्यांच्या मदतीने मृतदेह विहिरीबाहेर काढून आवश्यक ते सोपस्कार पार पडून मृतदेह उत्तरीय परिक्षणासाठी ग्रामीण रुग्णालय लाखनी येथे पाठविण्यात आला. शव विच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांचे ताब्यात देण्यात आला. स्थानिक स्मशान भूमीत त्याचेवर अंत्यसंस्कार करण्यात आले. लाखनी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून पोलिस निरीक्षक मिलिंद तायडे यांचे मार्गदर्शनात पोलिस हवालदार दिगंबर तलमले तपास करीत आहेत. मन मिळाऊ महेश च्या अकाली निधनाने गावात हळहळ व्यक्त होत आहे.


0 टिप्पण्या