Ticker

6/recent/ticker-posts

जि.प.शाळा माणिकवाडी येथील अमृत महोत्सवी स्वतंत्र दिन साजरा


रुपाली मेश्राम कार्य.संपादक चित्रा न्युज मो.9552073515

इस्लामपूर : माणिकवाडी (ता.वाळवा) येथील जि.प.शाळा माणिकवाडी येथील अमृत महोत्सवी स्वतंत्र दिनानिमित्तचे ध्वजारोहण नवनिर्वाचित उपसरपंच मा.श्री. शैलेश उत्तम पाटील यांच्या हस्ते झाले. अमृत महोत्सवी स्वतंत्र दिनाचे औचित्य साधत उपसरपंच शैलेश पाटील, ग्रामपंचायत सदस्या श्रीमती लक्ष्मी आटकेकर व फौजी श्री.मनोजकुमार बजरंग भिसे यांनी मॉडेल स्कूल योजनेस मदत म्हणून ४३" LED TV भेट दिली. तसेच उपसरपंच पाटील यांनी अंगणवाडीच्या सर्व चिमुकल्या विद्यार्थ्यांना नर्सरी ड्रॉइंग बुक, ड्रॉइंगचे सर्व साहित्य व खाऊ वाटप केले.

            यावेळी शैलेश पाटील यांची उपसरपंच पदी निवड झालेबद्दल जि.प.शाळेचे मुख्याध्यापक श्री.गोपीनाथ आडके, सर्व शिक्षक, शालेय शिक्षण समिती अध्यक्ष श्री विठ्ठल पवार व सर्व सदस्य यांनी त्यांचा सत्कार केला. तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेविका व विविध संस्थांच्या उपस्थित आजी-माजी चेअरमन व्हा.चेअरमन व संचालक यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर भाषणं व सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. त्यानंतर कृष्णा कृषी कॉलेज विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक अभ्यासक्रमा‌ अंतर्गत उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
         

यावेळी सरपंच श्री. वसंत शिंदे पाटील, राजारामबापू पाटील सहकारी दूध संघाचे संचालक श्री. संजय शिंदे, माणिकवाडी सेवा सोसायटीचे चेअरमन श्री. शंकर जाधव, ग्रामसेविका पुनम पाटील, ग्रामपंचायत सदस्य श्री.मधुकर खोत, सदस्या सौ.यशोदा शिंदे, श्रीमती लक्ष्मी आटकेकर, सौ.कल्पना मोहिते, सौ. ललिता मदने, पोलिस पाटील श्री.प्रविण नांगरे, माजी सरपंच शंकर खोत, माजी सरपंच विश्वास खोत, माजी ग्रा. सदस्य अजित खोत, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या अध्यक्षा सौ. वैशाली शिंदे, बचत गटाच्या सर्व महिला, श्री.सुनिल शिंदे, रमेश‌ शिंदे, अमोल गुरव, बाळू आण्णा, विजय जाधव, संजय खोत, गणेश आटकेकर, पै.अजय शिंदे, शिवाजी नांगरे, दिलीप शिंदे, शिवाजी खोत, विठ्ठल पवार, विलास खोत, अंकुश खोत, शंकर शिंदे, शामराव मदने, संजय सुतार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या सर्व कार्यकर्ते व ग्रामस्थ यांच्या उपस्थित उत्साहात पार पडला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या