• पोहरा येथील घटना
• पोलिसांत गुन्हा दाखल
कालिदास खोब्रागडे जिल्हा विशेष प्रतिनिधी भंडारा
मो.9545914324
भंडारा :- अंगणातील गॅस सिलेंडर का उचलला या क्षुल्लक कारणावरून वहिनीने ननदेस डोक्यावर दगडाने मारहाण करून जखमी केल्याची घटना नुकतीच उघडकीस आली. जखमी चे नाव शोभा क्रीष्णा कोसरे(५२) रा. पोहरा, तालुका लाखनी तर आरोपी वहिनीचे नाव यामिनी चेतन कोसरे(४०) रा. पोहरा असे आहे. लाखनी पोलिसांनी वहिनीवर गुन्हा दाखल केला असून पोलिस निरीक्षक मिलिंद तायडे यांचे मार्गदर्शनात तपास सुरू आहे.
शोभा कोसरे ही लहान भाऊ राकेश सोबत पोहरा येथे वास्तव्यास आहे. शोभा हिला चेतन व राकेश असे दोन भाऊ असून एकाच घरातील दोन वेगवेगळ्या खोलीत कुटुंबासह राहतात. लहान भावाचे मुलं अंगणात खेळत असताना अंगणात ठेवलेल्या गॅस सिलेंडर पासून जखम होऊ नये म्हणून ननदेने गॅस सिलेंडर बाजूला केले. या क्षुल्लक कारणावरून मोठी वाहिनी यामिनी हिने ननद शोभा कोसरे हीचेशी भांडण करून शिवीगाळ केली व केस ओढून दगडाने डोक्यावर मारहाण करून जखमी केल्याने ननदेला गंभीर दुखापत झाली. जखमीने लहान वहिनी कुमुद कोसरे हिचे सोबत लाखनी पोलिस ठाणे गाठून आपबिती सांगितली. पोलिस निरीक्षक मिलिंद तायडे यांनी जखमीस उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय लाखनी येथे पाठविले. जखमी चे फिर्यादी वरून तथा वैद्यकिय अहवालावरून लाखनी पोलिसांनी अपराध क्रमांक ३०४/२०२३ अन्वये गुन्हा दाखल करून कलम ३२४, ५०४ भादवि अन्वये पोलिस निरीक्षक मिलिंद तायडे यांचे मार्गदर्शनात पोलिस हवालदार दिगंबर तलमले तपास करीत आहेत. आरोपीस सूचना पत्र देऊन सोडण्यात आले.


0 टिप्पण्या