Ticker

6/recent/ticker-posts

भाजपा ओबीसी मोर्चा प्रदेशाध्यक्ष मा. संजयजी गाते यांचे ४ ऑगस्टला भंडारा जिल्ह्यात प्रथम आगमन

रुपाली मेश्राम कार्य.संपादक चित्रा न्युज मो.9552073515


भंडारा:-भारतीय जनता पक्ष ओबीसी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष मा संजयजी गाते तसेच प्रदेश प्रभारी मा आशीषजी देशमुख यांचे भंडारा जिल्ह्यात प्रथम आगमन होत असुन त्यांच्या स्वागताचा कार्यक्रम शुक्रवार, दिनांक ४ ऑगस्ट २०२३ रोजी दुपारी १२ वाजता सर्किट हाऊस, भंडारा येथे आयोजित करण्यात आला आहे.
सदर कार्यक्रमाला मा खासदार सुनिलभाऊ मेंढे, माजी आमदार डॉ परिणयजी फुके, भाजपा जिल्हाध्यक्ष मा प्रकाशभाऊ बाळबुधे, ओबीसी मोर्चाचे पुर्व विदर्भ संघटक मा रवीजी चव्हाण, माजी खासदार शिशुपाल जी पटले, माजी आमदार मा बाळाभाऊ काशीवार, माजी जिल्हाध्यक्ष मा तारीकजी कुरैशी, मा प्रदीपभाऊ पडोळे, मा अनुप ढोके, प्रदेश उपाध्यक्ष मा राजेशजी बांते, प्रदेश सचिव मा डी डी सोनटक्के, मा चामेश्वरजी गहाणे, जिल्हाध्यक्ष महेंद्र निंबार्ते प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत. यावेळी भाजपा प्रदेश, जिल्हा, तालुका पदाधिकारी, शक्ति केंद्र तसेच बुथ प्रमुखांनी उपस्थित राहावे असे आवाहन भाजपा ओबीसी मोर्चा तर्फे करण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या