रुपाली मेश्राम कार्य.संपादक चित्रा न्युज मो.9552073515
गडचिरोली - गेल्या महिन्याभरापासून रहिवासी दाखले मिळण्यासाठी नगर परिषद गडचिरोली कार्यालयाच्या चकरा मारूनही दाखले न मिळाल्याने अखेर वंचितच्या कार्यकर्त्यांनी व झोपडपट्टी धारकांनी मुख्याधिका-यांया कॅबिनला चपलाचा हार घालून रोष व्यक्त करण्यात आले.
एकता नगर येथील झोपडपट्टीधारकांना प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत घरे बांधून देण्याचे पत्र मुख्याधिकारी पिदुरकर यांनी दिले होते. परंतु अर्ज देऊनही एक महिणा झाला तरी रहिवासी प्रमाणपत्र देण्यात आले नसल्याने, संतप्त झालेल्या वंचितच्या पदाधिकारी व झोपडपट्टीधारकांनी नगर परिषद गाठत मुख्याधिका-यांच्या कॅबिनला चपलाचे हार धालून मुख्याका-यांचा निषेध केले.
यावेळी जोरदार घोषणाबाजी करून जोपर्यंत रहिवासी प्रमाणपत्र देत नाही, तोपर्यंत हटणार नाही अशी भूमिका घेतली असता प्रशासन नरमले. व मुख्याधिकारी पिदुरकर यांनी अखेर रहिवासी दाखल्यावर सही करून दाखले वितरीत केले.
यावेळी जिल्हाध्यक्ष बाळू टेंभुर्णे, उपाध्यक्ष जी के बारसिंगे, तालुकाध्यक्ष बाशिद शेख, महिला आघाडीच्या मालाताई भजगवळी, शहराध्यक्ष दिलीप बांबोळे, शोभा शेरकी, शकुंतला दुधे, वासुदेव मडावी , कवडू दुधे, सोनम साळवे, सोनम कुलसंगे, वदना येळमे, आदि वंचितच्या कार्यकर्त्यासहीत शेकडो झोपडपट्टीधारक उपस्थित होते.


0 टिप्पण्या