रुपाली मेश्राम कार्य.संपादक चित्रा न्युज मो.9552073515
कुर्ला :- वंचित बहुजन आघाडी कुर्ला तालुका, वार्ड क्रमांक १७०, आम्रपाली नगर येथे नागरीकांच्या मागणी नुसार वस्तीत काँक्रीटीकरण करण्यात आले. यासाठी विषेश सहकार्य कुर्ला तालुका अध्यक्ष स्वप्निल जवळगेकर यांनी केले. वस्तीत रस्त्याचे सिमेंट काँक्रीटीकरण केले. त्यावेळी स्थानिक नागरीक उपस्थित होते. त्यांनी वंचितचे आभार मानले. सदर काम रात्री उशीरा पर्यंत चालले,वॉर्ड क्रमांक १७० चे उपाध्यक्ष योगेश पाडमुख व रविंद्र कदम यांनी काम करुन घेतले.
टिप- सदर काँक्रीटीकरणाचे काम वंचित बहुजन आघाडी- कुर्ला तालुका स्वखर्चाने करत आहे.


0 टिप्पण्या