Ticker

6/recent/ticker-posts

डोंबिवलीतील सूतिका प्रसूती गृह खाजकीकरण रद्द करा - वंचित बहुजन आघाडीची मागणी

रुपाली मेश्राम कार्य.संपादक चित्रा न्युज मो.9552073515

डोंबिवली : - नागरिकांना सर्व सुविधा असलेलं सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटल उभारा, महिला प्रसूतीसाठी 50 खाटा ऐवजी 250 खाटा असल्या पाहिजे, त्याच इमारतीत डायलेसिस थॅलेसिमिया आजारासाठी स्वतंत्र 50 ते 50 खाटाचे कक्ष पाहिजे या साठी आज दि.17 ऑगस्ट 2023 रोजी 6 वे धरणे आंदोलन वंचित बहुजन आघाडी डोंबिवलीवतीने मोठ्या प्रमाणात करण्यात आले.

या आंदोलनाचे नेतृत्व डोंबिवली शहर अध्यक्ष सुरेंद्र ठोके,  उपाध्यक्ष राजु काकडे यांनी केले. प्रमुख उपस्थिती ठा. जी. महासचिव रेखाताई कुरवारे, वैषाली कांबळे, जिजाभाऊ गोंडगे, सुरेश छापरवाल, नंदाताई ढेकळे,सह्याद्री सामाजिक संघटनेचे नवनाथ मोरे,स. वि. आ.चे राजु खरात उपस्थित होते.

आयोजक ॲड.मिलिंद साळवे अर्जुन केदार, बाजीराव माने, अशोक गायकवाड, दीपक भालेराव,लक्ष्मण हजारे, प्रशांत टेकुळे, एजाज खान, नंदू पाईकराव, निलेश कांबळे विलास मोरे, संतोष खंदारे, दत्ता शेळके, अक्षय वाटुडे,ज्ञानू अंबोरे,पांडवीर साहेब,योगेश सुतार,अतिश जोंधळे, सचिन पठाडे,संदीप साळवे, प्रभाकर मोरे, महिला मंडल, कार्यकर्ते मोठ्याप्रमाणात उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या