Ticker

6/recent/ticker-posts

मारुती व्हॅन दुचाकीची धडक, २ महिला गंभीर

• पोहरा येथील घटना 

• लाखनी पोलिसांत गुन्हा दाखल

कालिदास खोब्रागडे जिल्हा विशेष प्रतिनिधी भंडारा मो.9545914324

भंडारा :- लाखनी कडून दुचाकीने गावाकडे जात असताना विरुद्ध दिशेने भरधाव येणाऱ्या मारुती व्हॅनने दुचाकीला धडक दिल्याने २ महिला गंभीर जखमी झाल्या. त्यांना नागपूर वैद्यकिय महाविद्यालयात उपचारासाठी भर्ती करण्यात आले आहे. जखमी महिलांची नावे रुकमा श्रीराम मेश्राम व माया सुकराम शहारे अशी आहेत. लाखनी पोलिसांनी मारुती व्हॅन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पोलिस निरीक्षक मिलिंद तायडे यांचे मार्गदर्शनात तपास सुरू आहे. 
             चंद्रशेखर बोरकर रा. पेंढरी हे त्यांची मोटरसायकल क्रमांक एमएच ३६ एके ३४६२ ने गावाकडे जात असताना रुकमा मेश्राम व माया शहारे ह्या बस स्थानक लाखनी लगत ऑटो ची वाट पाहत असल्याचे दिसल्याने त्यांना मोटरसायकलवर बसवून गावाकडे जात असताना पोहरा जवळ विरुद्ध दिशेने भरधाव वेगाने येणाऱ्या मारुती व्हॅन क्रमांक एमएच ३६ एएल १९५१ ने धडक दिल्याने दोन्ही महिला डांबरीकरणावर पडून जखमी झाल्या. अपघातग्रस्त मारुती व्हॅनने त्यांना भंडारा येथील एका खासगी रुग्णालयात भर्ती करण्यात आले. प्रकृती अत्यवस्थ असल्यामुळे प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी त्यांना वैद्यकिय महाविद्यालय नागपूर येथे पाठविण्यात आले. श्रीराम महादेव मेश्राम यांचे फिर्यादी वरून तथा वैद्यकिय अहवालावरून लाखनी पोलिसांनी मारुती व्हॅन चालकावर अपराध क्रमांक ३२०/२०२३ कलम २७९, ३३७, ३३८ भादवी तथा मोटारवाहन कायदा सहकलम १८४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस निरीक्षक मिलिंद तायडे यांचे मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक देविदास बागडे तपास करीत आहेत. वृत्त लिही पर्यंत आरोपी व्हॅन चालकाचे नाव कळू शकले नाही.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या