• गिरिधर मते दुसऱ्यांदा तंमुस अध्यक्ष पदी
कालिदास खोब्रागडे जिल्हा विशेष प्रतिनिधी भंडारा मो.9545914324
भंडारा :- आपसी सहमतीने गावातील लहान सहान भांडणतंट्याचे गावातच निराकरण करावे. हे तंटामुक्त समितीचे प्रमुख काम असताना तंमुस अध्यक्ष निवडीसाठी निवडणुकीचा आश्रय घ्यावा लागतो. याचा प्रत्यय लाखोरी येथे आला. निवडणुकीने गिरिधर मनोहर मते यांची महात्मा गांधी तंटामुक्त गाव समिती अध्यक्ष पदी दुसऱ्यांदा निवड करण्यात आली आहे.
लाखोरी ग्रामपंचायतीत सरपंच सुधीर चेटुले यांचे अध्यक्षतेखाली पंचायत समिती सदस्य सुनील बांते, ग्रामसेवक योगेश माटे, पोलिस पाटील निरू चेतन गिरेपुंजे, मुख्याध्यापक पुष्पा बोपचे, कृषी सहाय्यक टीचकुले मॅडम, उपसरपंच दिवाकर बांते, ग्रामपंचायत सदस्य विलास बांते, सदस्या वंदना गणवीर, उर्मिला उरकुडे, योगिता वाघाये, सामाजिक कार्यकर्ता अशोक बडवाईक आणि गावकऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीत सोमवारी(ता.२८) महात्मा गांधी तंटामुक्त गाव समिती अध्यक्षाकरिता ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. तंमुस अध्यक्ष पदाकरीता गिरिधर मनोहर मते आणि कमलाकर चेटूले यांचे २ अर्ज आल्याने निवडणूक घेण्यात आली. त्यात गिरिधर मते यांना १०१ तर कमलाकर चेटूले यांना ५१ मते मिळाल्याने गिरिधर मते यांना तंटामुक्त समिती अध्यक्ष घोषित करण्यात आले. ते दुसऱ्यांदा तंमुस अध्यक्ष पदी विराजमान झाले आहेत. मनोज रामटेके, ज्योती सपाटे, धनराज सपाटे, पूनेश्वर सिंगनजुडे, मंगेश हंबरे, ग्यानिराम टीचकुले, बाळकृष्ण वाघाये, गुनिराम वैद्य, विलास वडतकर, संजय वाघाये, मुन्ना गोंधुळे, विठ्ठल ढेंगे, नंदा बाभरे, मेघा मुटकुरे, सविता बांते, मीना बुराडे, पिंकी हिंगे, सरिता वडतकर, ज्योती वाघाये व ग्रामस्थांनी गिरिधर मते यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.


0 टिप्पण्या