Ticker

6/recent/ticker-posts

तिरोडा रेल्वे स्थानकावर सोयी सुविधा उपलब्ध करा-आ.रहांगडाले यांची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी

प्रवीण शेंडे जिल्हा प्रतिनिधी गोंदिया ग्रामीण
मो.9834486558

गोंदिया:- तिरोडा रेल्वे स्टेशन हे मुंबई हावडा मार्गावर स्थित असून या ठिकाणी दिल्ली मार्गावर तसेच बिलासपुर मार्गावर मोठ्या प्रमानात तालुक्यातील जनता, शैक्षणिक विद्यार्थी प्रवास करत असतात तसेच अदानी विद्युत प्रकल्प असल्याने येथील कर्मचा-यांना दिल्ली व पुणे  येथे ये-जा करावे लागते  तिरोडा स्थानकावर सरळ पुणे व दिल्ली जाण्याकरिता कोणतीच ट्रेन नसल्याने मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतो तसेच तिरोडा स्थानकावर दिव्यांग व वृद्ध प्रवाशांना नवीन पुलावरून चढणे उतरण्याकरिता समस्यांना सामोरे जावे लागते याची दखल घेत तिरोडा गोरेगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय रहांगडाले यांनी तिरोडा रेल्वे स्थानकावर  गाडी क्र. १२१२९ व १२१३० हावडा पुणे - पुणे हावडा आझाद हिंद एक्स्प्रेस तसेच १२४०९ व १२४१० ह. निजामुद्दीन रायगढ - रायगढ ह.निजामुद्दीन गोंडवाना एक्स्प्रेस या रेल्वे गाड्याचा थांबा देण्याबाबत केंद्रीय रेल्वे मंत्री यांना विनंती केलेली आहे तसेच दिव्यांग व वृद्ध प्रवाशांकरिता स्वचलित जिना किवा उद्वाहन ( लिफ्ट) ची सोय करण्याबाबत विनंती केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या