Ticker

6/recent/ticker-posts

२४ तास निशुल्क रुग्ण वाहिकेचा लाभ घ्यावा

• नरेंद्राचार्य संस्थान व महामार्ग पोलिसांचे आवाहन

कालिदास खोब्रागडे जिल्हा विशेष प्रतिनिधी भंडारा मो.9545914324

भंडारा:- महामार्गावर/रस्त्यावर होणाऱ्या अपघातांमध्ये गोल्डन अवर मध्ये वैद्यकीय मदत मिळू न शकल्याने अपघातामध्ये होणाऱ्या मृत्यू ची संख्या बरीच आहे. ही निकड लक्षात घेऊन जगतगुरु श्री नरेंद्राचार्य महाराज संस्थान, नाणिज च्या माध्यमातून रस्ते अपघातातील जखमींना तातडीने रुग्णालयात उपचाराकरिता नेता यावे याकरिता जिल्ह्यात निःशुल्क २४ तास अंबुलन्स सेवा सुरू करण्यात आली आहे. या सेवेचा लाभ घेण्याचे आवाहन सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोदकुमार बघेले यांनी केले आहे. 
       महामार्ग पोलीस केंद्र गडेगाव येथील पोलीस अंमलदार व त्यांचे मृत्युंजय दुत हे अपघातामधील जखमींना शक्य तितक्या लवकर मदत करून काही लोकांचे जीव वाचविले आहेत. हे लक्षात घेवून श्री नरेंद्राचार्य महाराज संस्थान येथील जिल्हा सामाजिक उपक्रम प्रमुख अशोक मोटघरे व संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी महामार्ग पोलिस मदत केंद्र गडेगाव येथे भेट देऊन सदर सेवेबद्दल माहिती दिली. या सेवेचा जास्तीत जास्त लोकांना लाभ मिळावा याकरिता संस्थांनाकडून तसेच महामार्ग पोलिस मदत केंद्र गडेगाव यांचेकडून संयुक्तपणे पुढाकार घेण्यात आला असून नागरिकांनी या सेवेचा जास्तीत जास्त प्रमाणात लाभ घ्यावा असे आवाहन महामार्ग पोलिस केंद्र गडेगाव चे प्रभारी अधिकारी प्रमोदकुमार बघेले यांनी केले आहे.
         या प्रसंगी पोलिस उपनिरीक्षक नितीन आगाशे, पोलिस हवालदार रेहपाडे, नखाते, पोलिस नायक आगाशे, टेंभूर्णीकर, वावरे, हुमणे तसेच जगद्गुरु श्री नरेंद्राचार्य महाराज संस्थान चे जिल्हा सामाजिक उपक्रम प्रमुख अशोक मोटघरे, लाखनी तालुका प्रमुख नरेंद्र बामणे, तालुका सचिव राजेन्द्र गायधने, तालुका सेवा केंद्र युवा प्रमुख शैलेश साठवणे, चालक प्रमोद मोहतूरे प्रामुख्याने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या