• लाखनी येथील घटना
• मृतदेहाचा झाला चेंदामेंदा
कालिदास खोब्रागडे जिल्हा विशेष प्रतिनिधी भंडारा मो.9545914324
भंडारा :-लाखनी शहरातून जाणाऱ्या उड्डाणपुलावर मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात वाहनाच्या धडकेत अनोळखी अंदाजे ५० वर्षीय इसमाचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी मध्यरात्री १:०० वाजता दरम्यान उघडकीस आली. मृतकाचे नाव कळू शकले नाही. याप्रकरणी लाखनी पोलिसांनी अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पोलिस निरीक्षक मिलिंद तायडे यांचे मार्गदर्शनात तपास सुरू आहे.
शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण झाल्याने सुसाट वेगाने वाहने धावत असत. त्यामुळे शहरात अपघाताचे प्रमाणात वाढ झाली होती. अपघात कमी करण्यासाठी उड्डाण पुलाचे बांधकाम करण्यात आले. शहराला दोन भागात विभागणारा उड्डाण पूलावरून वाहतूक सुरू आहे. भंडारा कडून साकोली कडे जाणाऱ्या अज्ञात वाहन चालकाने भरधाव वेगाने आपले वाहन चालवून अनोळखी ५० वर्षीय इसमास धडक दिली. त्यात त्याचा जागीच मृत्यु झाला. मृतदेहावरून वाहनाचे चाक गेल्याने अक्षरश: मृतदेहाचा चेंदामेंदा झाला. घटनेची माहिती लाखनी पोलिसांना मिळताच घटनास्थळ गाठून पंचनामा करून मृतदेह उत्तरीय परीक्षणासाठी ग्रामीण रुग्णालयात येथेपाठविण्यात आला. पोलीस निरीक्षक मिलिंद तायडे यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष चीलांगे करीत आहेत.
*असे आहे मृतकाचे वर्णन(चौकट)*
मृतकाची वय अंदाजे वय ५० वर्ष असून वेडसर आहे. केस - दाढी वाढलेली असून अंगात जुने मळकटलेले पॅन्ट असून बटन न लावलेली शर्ट असून उलटी अंडर विअर घातलेली आहे. अश्या वर्णाच्या व्यक्तीस कुणी ओळखत असल्यास लाखनी पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन लाखनी पोलिसांनी केले आहे.


0 टिप्पण्या