Ticker

6/recent/ticker-posts

कुर्ल्यात स्वातंत्र्य दिना निमित्त वंचितच्यावतीने आरोग्य शिबीर संपन्न


रुपाली मेश्राम कार्य.संपादक चित्रा न्युज मो.9552073515

कुर्ला- वंचित बहुजन आघाडी च्या वतीने हनुमान नगर बिल्डिंग नंबर १४५ जवळ नेहरु नगर कुर्ला पुर्व.२४ येथे झेंडा वंदन करण्यात आले.  उपस्थित नागरिकांना कुर्ला तालुका अध्यक्ष स्वप्नील जवळगेकर यांनी  लोकशाही टिकवायची असेल तर आणि अखंड भारतात ती लोकशाही नांदवायची असेल तर ॲड.प्रकाश आंबेडकर यांना साथ देण्याच आव्हान केले. तसेच आरोग्य शिबीर आयोजन करण्यात आले त्यावेळी- नाडी परिक्षण, प्रकृती परिक्षण, आहार सल्ला, नेत्र चिकित्सा, ब्लड प्रेशर, डायबेटिज, ई.सी.जी, बी.एम.आय व बॉडी फॅट अनेक उपचार देण्यात आले आणि स्थानिक नागरीकांनी देखील मोठ्या प्रमाणात लाभ घेत प्रतिसाद दिला. 

कार्यक्रमास जिल्हा अध्यक्ष संतोष अबुलगे, महासचिव सचिन सोनावने,सचिव संदिप मोरे, मुंबई उपाध्यक्ष सुधाकर कांबळे स्थानिक शिवसेना माजी नगरसेविका प्रवीणा मोरजकर,शिवसैनिक मनिष मोरजकर यांनी भेट दिली.त्यावेळी तालुका अध्यक्ष स्वप्नील जवळगेकर, वार्ड अध्यक्ष रवी रसाळ,किरण कांबळे,सचिन जाधव, भिमराव शिनगारे, महिला अध्यक्ष संध्या पगारे, महिला वार्ड अध्यक्ष वर्षा लिहिणार,लता गवळी,मुक्ता खंडागळे सह जिल्हा,तालुका,वार्ड मधिल अनेक कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या