रुपाली मेश्राम कार्य.संपादक चित्रा न्युज मो.9552073515
खोपोली - वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून पनवेल महानगरपालिका चतुर्थ श्रेणी सफाई कामगारांचे सन्मान प्रमाणपत्र मानचिन्ह देऊन स्वागत करण्यात आले. तसेच सदर कार्यक्रमास वंचित बहुजन आघाडी रायगड जिल्हा उपाध्यक्ष प्रदीप कांबळे साहेब, रायगड जिल्हा महासचिव वैभव केदारी यांच्या हस्ते करण्यात आले. व सदर कार्यक्रमास आलेल्या मान्यवरांचे व नागरिकांचे आभार वंचित बहुजन आघाडी खारघर शहराध्यक्ष राहुल वानखडे यांच्या हस्ते करण्यात आले व सर्व भारतीयांना स्वतंत्र दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी भारतीय बौद्ध महासभा शाखा खारघर तसेच तथागत महाविहार संस्था, प्रबुद्ध महिला संघ ,खारघर युथ फाऊंडेशन व शिवगर्जना मित्र मंडळ यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पाडण्यात आला. सदर कार्यक्रम हा वंचित बहुजन आघाडी शाखा खारघर केंद्रीय विहार बस स्थानक कॅनरा बँक शेजारी घेण्यात आला.


0 टिप्पण्या