जळगाव येथील मा.शिवराम पाटील यांचं आंदोलन शहर व जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कारभारासह शासकीय कार्यालयांतील सत्यस्थिती उघड करीत आले आहे. लोकांच्या हक्कांसाठी व प्रशासकिय भ्रष्टाचार व अन्याया विरुद्धच्या लढ्यासाठी शिवराम पाटील सदैव तत्पर असल्याचे स्थानिक आणि इतरत्र प्रसारित होणाऱ्या वृत्तपत्र , सोशल मीडियात आलेल्या बातम्यांमधून दिसून येत आहे. त्यांच्या लिखाणातून रोज नवनवीन गोष्टींची माहिती मिळत असते. शिवाय प्रत्येक दिवशी आरोग्य, अर्थ, धार्मिक व विज्ञान विशेष राजकिय विषयावर खास लिखाण दिल्याने वाचकांच्या ज्ञानात चांगलीच भर पडत आहे. त्यामुळे दै. शिवराम पाटील जणू एक प्रकारे आधुनिक शिक्षकाचे काम करीत आहे. याशिवाय कृती, विचार, संस्कार, समाज यांच्या मूल्यांकनाचे कामही अतिशय चोखपणे करीत आहे. शिवराम पाटील' ही एक चळवळ आहे, जी अन्यायाला वाचा फोडत आहे. जनतेला आता जाणीव होवू लागली असुन राजकिय नेत्यांच्या यादीत समाविष्ट भ्रष्ट कारभार उघड होत आहेत. भावि कार्यासाठी हार्दिक शुभेच्छा.
डॉ धर्मेश पालवे.. जळगांव
(राजकिय तथा सामाजिक लिखाण तसेच नाटक व चित्रपट लिखाण)


0 टिप्पण्या