Ticker

6/recent/ticker-posts

लाखनी तालुक्यात सरासरी ९३ टक्के रोवणी पूर्ण

• २० हजार ११० हेक्टर क्षेत्रात रोवणी तर ५३९ हेक्टर क्षेत्रात आवत्या

कालिदास खोब्रागडे जिल्हा विशेष प्रतिनिधी भंडारा मो.9545914324

भंडारा :- आद्रा नक्षत्रापासून आश्लेषा नक्षत्रापर्यंत पेरणी व रोवणीस पोषक पाऊस येत असल्यामुळे १७ ऑगस्ट पर्यंत २ हजार १६१.०५ हेक्टर क्षेत्रात नर्सरी(पऱ्हे) तर आवत्या धान ५३८.८० हेक्टर असे एकूण २१ हजार ६३८.८५ हेक्टर क्षेत्रात धानाची लागवड करण्यात आली असून २० हजार १५० हेक्टर क्षेत्रात रोवणी पूर्ण झाली. त्याचे शेकडा प्रमाण ९३.१६ टक्के आहे. असे तालुका कृषी अधिकारी यांचे खरीप हंगाम पीक पेरणी अहवाल २०२३ मध्ये नमूद आहे. याशिवाय कडधान्य १ हजार ५६.६५ हेक्टर, गळीत धान्य ९.९० हेक्टर, भाजीपाला १३४.९० हेक्टर, मसाला पिके ३.७० हेक्टर, ऊस १७.५० हेक्टर, पपई ०.५० हेक्टर, चारा पिके ११.१० हेक्टर असे लागवडी खालील एकूण २१ हजार ९२३.०५ हेक्टर आहे.
           तालुक्यात मोठा किंवा मध्यम सिंचन प्रकल्प अस्तित्वात नसल्यामुळे बहुतांश शेतजमीन कोरडवाहू होती. त्यामुळे धान उत्पादकांना नेहमीच दुष्काळ सदृश्य परिस्थितीचा सामना करावा लागत असे. यावर मात करण्यासाठी अनेक अल्प व अत्यल्प शेतकऱ्यांनी शासकीय योजनेतून सिंचन विहिरी तयार केल्या तर सधन शेतकऱ्यांनी शेतात खासगी बोअरवेलची व्यवस्था केल्याने सिंचन क्षेत्रात वाढ झाल्यामुळे रोहिणी व मृग नक्षत्र कोरडे गेले असले तरी बहुतांश सिंचनाची सोय असलेल्या शेतकऱ्यांची पेरणी आटोपण्याच्या मार्गावर होती. २६ व २७ जून रोजी झालेल्या अतिवृष्टीने कोरडवाहू शेतकऱ्यांनीही पेरणीस सुरुवात केली. पुनर्वसु, पुष्य  नक्षत्रात पोषक पाऊस झाल्यामुळे रोवणीही जोमात सुरू होती. आश्लेषा नक्षत्रात पावसाने दडी मारल्यामुळे झालेली रोवणी वाळण्याचे मार्गावर असून काही शेतकऱ्यांची रोवणी मुदत संपूनही झाली नाही. 
             साकोली व लाखांदूर तालुक्याचे विभाजन करून लाखनी तालुक्याची निर्मिती करण्यात आली. भौगोलिक क्षेत्र ३३ हजार १७३.३६ हेक्टर असून खरीप पिकाखालील क्षेत्र २२ हजार २०७.७८ हेक्टर आहे. खरीप हंगाम २०२३ मध्ये अन्यधान्य, कडधान्य, गळीतधान्य, भाजीपाला,  मसाला पिके, ऊस, फळबाग व चारा पिकांची लागवड केली जाते. १७ ऑगस्ट पर्यंत पऱ्हे(नर्सरी) २ हजार १६१.०५ हेक्टर आणि आवत्या ५३८.८० हेक्टर क्षेत्रात अशी एकूण २१ हजार ६३८.८५ हेक्टर क्षेत्रात पेरणी तर २० हजार १५० हेक्टर क्षेत्रात रोवणी झाली असून त्याचे शेकडा प्रमाण ९६.१६ टक्के आहे. असे तालुका कृषी अधिकारी यांचे अहवालात नमूद आहे.


धान पिकावर रोग आणि किडीचा प्रादुर्भाव

खरीप हंगाम २०२३ मध्ये सिंचनाची सोय असणाऱ्या शेतकऱ्यांनी सर्वप्रथम रोवणी केली होती. या धानावर करपा आणि खोडकिडा या रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने धान उत्पादक शेतकरी हवालदिल झाला असून उपाययोजनात व्यस्त असल्याचे चित्र तालुक्यात दिसत आहे.

नर्सरी चे क्षेत्र कमी झाले नसल्याने संभ्रम

खरीप हंगाम २०२३ मध्ये २ हजार १६१.०५ हेक्टर क्षेत्रात धान नर्सरी(पऱ्हे) ची लागवड करण्यात आली. १७ ऑगस्ट पर्यंत २० हजार १५० हेक्टर क्षेत्रात रोवणी करण्यात आली असली तरी नर्सरी चे क्षेत्र कमी केले गेले नसल्यामुळे शेतकऱ्यांत संभ्रम निर्माण झाला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या