लिंगोजी कदम :- जिल्हा प्रतिनिधी ग्रामीण नांदेड
मो.9689821132 .
हिमायतनगर -: दि 29 सप्टेंबर च्या दुपारी 1 ते 2 वाजे च्या दरम्यान हिमायतनगर तालुक्यातील मौजे एकंबा परिसरात अचानक सुरू झालेल्या वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटा मधील पाऊसात शेतात काम करणारी महिला शांताबाई पुंजाराम खंदारे या महिलेवर वीज पडून तिचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली त्यामुळे एकंबा गावावर शोककळा पसरली आहे
अगोदरच नुकसानीच्या गर्तेत सापडलेला शेतकरी परेशान असताना एका अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या कुटुंबावर आज दिनांक 29 सप्टेंबर च्या दुपारी हिमायतनगर तालुक्यात झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसामध्ये शेतात काम करणाऱ्या शांताबाई पुंजाराम खंदारे वय अंदाजे 50 वर्ष ह्या महिलेवर वीज पडून तिचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली ही बातमी समजताच हदगाव हिमायतनगर तालुक्याचे आमदार माधवराव पाटील जवळगावकर तात्काळ मयत खंदारे कुटुंबाची हिमायतनगर शहरातील ग्रामीण रुग्णालय येथे भेट घेऊन त्यांच्या कुटुंबांचे सांत्वन केले व त्यांना शासनाकडून जी काही मदत देण्यात येईल ह्यासाठी मी प्रयत्न करतो असे सांगितले मयत महिलेच्या मृत्यू पश्चात पती, तीन मुले व दोन मुली नातूपंतू असा मोठा परिवार आहे


0 टिप्पण्या